शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Ram Mandir: २२ तारखेला अयोध्येत खेळाडूंचा मेळावा! कोणाकोणाला मिळालं निमंत्रण, जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 18:06 IST

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रामललाच्या मूर्तीचा अभिषेक येत्या सोमवारी होणार असून त्याची तयारी जोरात सुरू आहे. प्राणप्रतिष्ठेचा विधी १९ जानेवारीपासून सुरू झाला असून तो २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने घेतली असून त्यात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन आणि पाहुण्यांना आमंत्रित करण्याची जबाबदारी आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी १ हजारहून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विविध खेळातील शिलेदार देखील या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. 

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व्यतिरिक्त या यादीत रवींद्र जडेजाच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय दिग्गज खेळाडू सुनिल गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याही नावाचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाला २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. त्यामुळे टीम इंडियातील कोणकोणते खेळाडू उपस्थित राहतात हे पाहण्याजोगे असेल. 

२२ तारखेला अयोध्येत खेळाडूंचा मेळावाविविध खेळातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पीटी उषा, अनिल कुंबळे, कपिल देव, लिएंडर पेस, महेंद्रसिंग धोनी, मिताली राज, हरमनप्रीत कौर, नीरज चोप्रा, पुलेला गोपीचंद, पीव्ही सिंधू, राहुल द्रविड, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, सौरव गांगुली, सुनिल गावस्कर, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, विश्वनाथन आनंद, कर्णम मल्लेश्वरी, कल्याण चौबे, देवेंदा झांजाडाले, बायचुंग भुतिया, बचेंद्री पाल, प्रकाश पादुकोण यांचा समावेश आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याVirat Kohliविराट कोहलीMS Dhoniमहेंद्रसिंग धोनीHarmanpreet Kaurहरनमप्रीत कौर