विविध वृत्त
By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST
सोमवारी लोकशाही दिन
विविध वृत्त
सोमवारी लोकशाही दिन सोलापूर: येत्या सोमवारी म्हणजेच 4 जानेवारी 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 वाजता लोकशाही दिन आयोजित केला आहे. संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक सुट्या जाहीरसोलापूर : जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोलापूर जिल्?ासाठी सन 2016 या वर्षातील स्थानिक सुट्या जाहीर केल्या असून, त्या पुढीलप्रमाणे- 15 जानेवारी (शुक्रवार) मकर संक्रांती, 15 जुलै (शुक्रवार) आषाढी एकादशी व 15 सप्टेंबर (गुरुवार) अनंत चतुर्दशी यादिवशी महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. तसेच या दिवशी शासकीय कोषागारे बंद राहतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे पत्रकान्वये जाहीर केली आहे.कुटुंब व निवृत्ती वेतनधारकांना आवाहनसोलापूर : जिल्?ातील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक ज्यांची वयाची 80 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा निवृत्ती वेतनधारकांनी जन्माचा पुरावा म्हणून पॅन, आधार कार्ड अथवा सरकारी हॉस्पिटलचे सर्टिफिकेट यापैकी एखादा पुरावा साध्या अर्जासोबत जोडून सादर करावा. ज्या राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी आपला नामनिर्देशन फॉर्म नं. 42 सादर केला नाही, अशांनी दोन प्रतीत नामनिर्देशन फॉर्म भरून जिल्हा कोषागार कार्यालयात तत्काळ सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर जड वाहतुकीस बंदीसोलापूर : पंढरपूर शहरातील लिंक रोड या बा?वळण मार्गावर जड व अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रसंग उद्भवल्याने 19 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर पंढरपूर शहरातील लिंक रोड बा?वळण मार्गावरील जड वाहतुकीस बंदी घातली आहे. त्यानुसार बा?वळण मार्गावरून सोलापूर-बार्शी नगर बाजूकडून येणारी व पंढरपुरातून जाणारी वाहने यामध्ये ट्रॉलीसह ट्रेलर कंटेनर, गॅस टँकर (ट्रॅक्टर ट्रॉलीसह वगळून) या वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा याठिकाणाहून पंढरपूरला जाण्यास बंदी घातली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून मोहोळ-कामती-मंगळवेढा- सांगोला आदी ठिकाणांद्वारे वाहनधारकाने इच्छितस्थळी पोहोचावे. त्याचबरोबर विजापूर-कोल्हापूर-सांगली-सातारा-आटपाडी- पुण्याकडून येणार्या वाहनांनी पर्यायी मार्ग म्हणून कामती-मंगळवेढा-सांगोला-महुद-वेळापूर-अकलूज तसेच टेंभुर्णीमार्गे किंवा वेळापूर-महुद-सांगोला-मंगळवेढा-कामती-मोहोळ आदी मार्गाचा अवलंब करावा. संबंधित वाहनांना कामती-मंगळवेढा नाका, सांगोला नाका, महुद-साळमुख फाटा, ज्ञानेश्वर चौक वेळापूर आदी मार्गावरून पंढरपूरकडे येणार्या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद केला आहे. या प्रायोगिक तत्त्वावरील वाहतूक व्यवस्थेची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.