शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सरकार म्हणजे बरोबरच, ही भूमिका चालणार नाही!; सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 10:00 IST

लसीच्या वेगवेगळ्या किमती तसेच पुरवठा धोरणाबद्दल कोर्टाने सरकारला धारेवर धरले

नवी दिल्ली : देशात लसीची किंमत एकच असायला हवी. आम्ही सरकार आहोत, म्हणजे बरोबरच आहोत, न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत, असे तुम्ही म्हणून चालणार नाही. आम्हालाही अधिकार आहेत हे ध्यानात ठेवा, असे खडे बोल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले. लसीच्या वेगवेगळ्या किमती तसेच पुरवठा धोरणाबद्दल कोर्टाने सरकारला धारेवर धरले. विविध राज्ये, महापालिकांनी लसीसाठी जागतिक निविदा काढाव्या असे सरकारचे धोरण आहे काय, असा सवालही न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एल. नागेश्वर राव, न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने विचारला. या काळात अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा धोरणाच्या फेरआखणीच्या मुद्द्याची कोर्टाने स्वत:हून दखल घेतली. याबद्दलच्या याचिकेची सोमवारी सुनावणी झाली. धोरणात्मक  बाबींचा फेरआढावा घेण्याचे कोर्टांना मर्यादित अधिकार आहेत, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात सांगताच, खंडपीठाने सरकारला खडे बोल सुनावले. न्या. धनंजय चंद्रचूड यांनी केंद्राला सांगितले की, आम्ही धोरणात बदल करणार नाही. मात्र केंद्राने देशात नेमकी काय स्थिती उद्भवली आहे, ती नीट पाहावी. राज्यांनी लसीसाठी परस्परांशी स्पर्धा करावी असे सरकारचे धोरण आहे. नेमक्या याच गोष्टी आक्षेपार्ह आहेत. लसींबाबत धोरणाचे दस्तावेज उपलब्ध नाहीतकेंद्र सरकारचे कोरोना लसीसंदर्भातील नेमके धोरण काय आहे, याचे दस्तावेज उपलब्ध नाहीत. लस केंद्र सरकारला कमी किमतीत मिळणार व उत्पादक या लसी इतरांना देताना त्या मोफत किंवा त्यांना वाटेल त्या किमतीत देणार असा कारभार चालला आहे.  केंद्राने लसीबाबतचे नेमके धोरण स्पष्ट करावे, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला.समानता शक्यच नाहीप्रत्येक राज्य, महापालिकेने आवश्यक तितक्या लसी मिळवाव्यात असे केंद्र सरकारचे धोरण आहे का, अशी विचारणा कोर्टाने केली. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प देशातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पाएवढा आहे. अशा स्थितीत लस मिळविण्याच्या धोरणात समानता येणे शक्यच नाही, असे सुप्रीम कोर्टाने  सुनावणीत म्हटले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय