शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीच्या राजघराण्याचे वारसदार ते चौकीदार; 'हे' आहेत मोदींचे सूचक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 13:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीच्या मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज भरला आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीवाराणसीच्या मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज भरला आहे. गुरुवारी आयोजित केलेल्या ऐतिहासिक रोड शोमध्ये काशीच्या जनसभेला संबोधित केलं आणि त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी मागितली होती. गेल्या वेळीसारखेच यंदाही मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 सूचक उपस्थित होते. मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कालभैरवाचंही दर्शन घेतलं होतं. यावेळी मोदींच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सूचकांमध्ये डोमराजांच्या परिवारापासून चौकीदाराचा समावेश होता.यंदा डोमराजाच्या परिवाराचा एक सदस्य मोदींचा सूचक झाला होता. तसेच पटेल धर्मशाळेचे रामशंकर पटेलही उमेदवारी अर्ज भरणाऱ्या मोदींचे सूचक राहिले आहेत. पंतप्रधान मोदींच्या दोन अन्य सूचकांमध्ये पाणिनी कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य अन्नपूर्णा शुक्ला आणि एका चौकीदाराचा समावेश आहे. सूचकांद्वारे मोदी सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करतात हे दाखवू इच्छितात. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी शुक्ला यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिवस, तारीख आणि योग जुळून यावा, यासाठी काशीच्या पंडितांनी शुभ मुहूर्त काढला होता. 26 एप्रिलला शुभ मुहूर्तावर मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये भव्य रोड शो काढून शक्तिप्रदर्शन केलं. बनारस हिंदू विद्यापीठाजवळील पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोदींच्या रोड शोची सुरुवात झाली. मोदींच्या रोड शोसाठी वाराणसीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सुमारे सात किलोमीटरच्या रोड शोच्या माध्यमातून मोदी आणि भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रोड शो समाप्त झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी गंगा आरतीला उपस्थिती लावत गंगा आरती केली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. गंगा आरतीसाठी वाराणसीतील घाटांवर आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकvaranasi-pcवाराणसी