शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Vanshika Pandey : अभिमानास्पद! वंशिका पांडे बनली छत्तीसगडची पहिली महिला लेफ्टनंट; जाणून घ्या, कशी झाली निवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:58 IST

Vanshika Pandey : वंशिकाच्या या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. 

नवी दिल्ली : सध्याच्या काळात देशातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. यातच छत्तीसगडच्या वंशिका पांडेचे नाव जोडले गेले आहे. संपूर्ण छत्तीसगडला वंशिकाचा अभिमान वाटत आहे. कारण, वंशिका भारतीय लष्करात लेफ्टनंट बनणारी छत्तीसगडमधील पहिली महिला ठरली आहे. वंशिकाच्या या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. 

वंशिका पांडे ही छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील रहिवासी आहे. ती लहानपणापासूनच गुणवंत विद्यार्थिनी आहे. राजनांदगाव येथील बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये वंशिकाने इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर तिने युगांतर पब्लिक स्कूलमधून दहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. इंजिनीअरिंगच्या अभ्यासासाठी तिने जबलपूरच्या ज्ञान गंगा इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

इंजिनीअरिंगदरम्यान सैन्यात भरती होण्याचा निर्णयवंशिका पहिल्यापासून अभ्यासात हुशार होती.  भोपाळच्या राजीव गांधी औद्योगिक विद्यापीठात मेरिट लिस्टमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला होता. याशिवाय वंशिकाने मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये देशभरातून तिसरा क्रमांक पटकावला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना वंशिकाने सांगितले की, तिने जबलपूरमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि तेथे लष्कराचे प्रशिक्षण आहे आणि तेथे गेल्यानंतर तिने काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर तिने लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली.

अशी झाली निवडएसएसबी परीक्षेत निवड झाल्यानंतर वंशिका ऑफिसर्स ट्रेनिंगसाठी चेन्नईला गेली. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी येथे पार पडलेल्या पासिंग आऊट परेडमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वंशिकाने मोर्च पास केले आहे. लष्करात 11 महिन्यांच्या उच्च प्रशिक्षणानंतर तिला आता लेफ्टनंट पद मिळाले आहे. छत्तीसगडची पहिली महिला लेफ्टनंट होण्याचा मान मिळवणारी वंशिका पांडे जेव्हा आपल्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या अभिनंदनासाठी लोकांची गर्दी झाली होती. दरम्यान, या यशामागे वडील वंशिक अजय पांडे, आई सरला पांडे आणि बहीण मानसी पांडे यांचे पूर्ण सहकार्य लाभले, असे वंशिकाने सांगितले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडIndian Armyभारतीय जवानCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन