शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

'वंदे भारत'नंतर आता रेल्वे आणणार 'वंदे मेट्रो ट्रेन'; प्रवास आणखी सुपरफास्ट होणार, कशी असेल ट्रेन वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 08:31 IST

Vande Metro Train: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये मोठी भेट दिली आहे.

Vande Metro Train: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये मोठी भेट दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर आता भारतीय रेल्वे २०२४-२५ मध्ये 'वंदे मेट्रो ट्रेन' सुरू करणार असल्याची घोषणा केली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे मेट्रो शहरांमध्ये ५०-६० किमी अंतर कापण्यासाठी संकल्पना घेऊन येत आहे. या वर्षी उत्पादन आणि डिझाइनचे काम केले जाईल. पुढील वर्षापासून ते सुरू करण्याचे नियोजन आहे. वंदे मेट्रो १२५ ते १३० प्रति किलोमीटर वेगाने धावणार आहे. त्याची रचना मुंबई उपनगराच्या धर्तीवर केली जाणार आहे. मात्र, वंदे मेट्रोमध्ये शौचालयाची सुविधा असणार नाही.

वंदे मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्येवंदे मेट्रो ट्रेन १९५० आणि १६० च्या दशकात डिझाइन केलेल्या अनेक ट्रेनची जागा घेईल. वंदे मेट्रो ट्रेनच्या डिझाईनबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र त्यातील सुविधा काही प्रमाणात वंदे भारत गाड्यांप्रमाणेच असतील, असं सांगितलं जात आहे. इंजिन पूर्णपणे हायड्रोजन आधारित असेल. त्यामुळे प्रदूषण शून्य होईल. वंदे भारत ट्रेनप्रमाणे या ट्रेनमध्येही आधुनिक ब्रेक सिस्टिम, रेड सिग्नल ब्रेकिंग टाळण्यासाठी कवच ​​सुरक्षा यंत्रणा, ऑटोमॅटिक डोअर, फायर सेन्सर, जीपीएस, एलईडी स्क्रीन या सुविधा असतील, ज्यामुळे प्रवाशांना पुढील स्टेशनची अगोदर माहिती मिळेल. या ट्रेनचे भाडे खूपच कमी असेल, जेणेकरून गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांनाही प्रवास करता येईल.

'नो वेटिंग'वर रेल्वेमंत्री म्हणतात...रेल्वे तिकीटातील वेटिंग लिस्ट कधी संपणार? या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, १० वर्षांपूर्वी दररोज ४ किमीचे नवीन ट्रॅक बनवले जात होते. आज दररोज १२ किमीचे नवीन ट्रॅक टाकले जात आहेत. पुढच्या वर्षी ही क्षमता १६ किमी पर्यंत नेली जाईल. अनेक दशकांच्या उणिवा ८ वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करूनच मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी होईल. यानंतरच वेटिंग लिस्ट हद्दपार करण्याबाबत काही सांगता येईल.

रेल्वेला ७० हजार कोटींची कमाई अपेक्षितभारतीय रेल्वेने आपले उत्पन्न आणि खर्चाचा तपशीलही अर्थसंकल्पात दिला आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात प्रवाशांकडून ७०,००० कोटी रुपयांची कमाई झाल्याचा अंदाज आहे, जो गेल्या अर्थसंकल्पीय सत्रात ६४,००० कोटी रुपये होता. त्याच वेळी, मालवाहतुकीतून यंदा १.७९ लाख कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे, जी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १.६५ लाख कोटी रुपये होती.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस