शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Vande Mataram and Jana Gana Mana: 'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीतासमान दर्जा मिळावा!; उच्च न्यायालयात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:28 IST

अशी मागणी का करण्यात आली आहे... वाचा सविस्तर

Vande Mataram and Jana Gana Mana: दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र आणि दिल्ली सरकारला 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम्'च्या समान प्रचारासाठी धोरणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली आणि प्रतिवादींना त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी मुदत दिली. या याचिकेवर न्यायालयाने नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) कडूनही उत्तर मागितले आहे. सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्येक कामकाजाच्या दिवशी 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम्' म्हंटलं जायला हवं, यासाठी केंद्र आणि दिल्ली सरकारला निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, याचिका सुनावणीसाठी यादीत येण्यापूर्वीच याचिका दाखल केल्याचे प्रसिद्ध केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ही याचिका प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यानंतर याचिकाकर्त्याने खेद व्यक्त केल्याचे नमूद करून असे कृत्य पुन्हा करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच, या याचिकेवर सुनावणी केली जाईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

का दाखल केली याचिका?

याचिकाकर्त्यांच्या मतानुसार, वंदे मातरम् चा सन्मान केला जायला हवा. वंदे मातरम् कसे म्हणावे याचे कोणतेही नियम किंवा निर्देश नसल्याने काही लोक त्याचे चुकीच्या पद्धतीने गायन करतात. तसेच, चित्रपट आणि इतर कार्यक्रमांमध्ये या गीताचा दुरूपयोग केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या गीताने ऐतिहासिक भूमिका बजावली असून संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० मध्ये केलेल्या विधानाचा विचार करता या गीताला 'जन गण मन' सारखाच आदर-सन्मान दिला जायला हवा.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNational Anthemराष्ट्रगीतCourtन्यायालय