नवी दिल्ली - जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकान्सेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होत असल्याने बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टम लेव्हल-२ सिग्नलिंग सिस्टीमसाठी निविदा मागवली आहे. ही यंत्रणा वंदे भारत गाड्यांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येणार आहे.
२०२६मध्ये सुरत-बिलिमोरा दरम्यान शिंकान्सेन बुलेट ट्रेन धावतील, असे अपेक्षित होते, परंतु आता ते २०३० पूर्वी शक्य नाही. २०१७ मध्ये बुलेट ट्रेल प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ झाला होता, त्याला आता ८ वर्षे होत आहेत.
लेव्हल-२ सिग्नलिंग सीस्टिम वंदे भारत गाड्या तात्पुरत्या उपाय म्हणून बुलेट ट्रेन मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी युरोपियन ट्रेन कंट्रोल सीस्टिम लेव्हल-२ सिग्नलिंग सीस्टिम बसवली जाईल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने सात वर्षांच्या करारासाठी निविदा जारी केली आहे. कशामुळे हा निर्णय?सुविधा पडून राहण्यापेक्षा त्यांचा वापर वंदे भारत ट्रेनसाठी करता येईल. या काळात बुलेट ट्रेनसाठी लागणारी सिग्नल यंत्रणा लावता येईल.