Vande Bharat Sleeper Train News:भारतीय रेल्वेची सर्वांत प्रिमियम, वेगवान, लोकप्रिय आणि हायस्पीड ट्रेन म्हणजे वंदे भारत. वंदे भारत ट्रेनच्या देशभरातील मार्गावर सेवा सुरू आहेत. यातच अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेनच्या सेवांमध्ये वाढ केली जात आहे. यातच वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन कधी येणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. यातच वंदे भारत स्लीपर ट्रेनची एक चाचणी घेण्यात आली असून, या ट्रेनने १८० प्रति तास हा वेग सहज गाठला. वंदे भारत स्लीपर ट्रेनची कामगिरी इतकी आरामात झाली की, केबिनमध्ये ठेवलेल्या ग्लासमधील एक थेंबही पाणी सांडले नाही. या चाचणीचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे म्हटले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी स्लीपर वंदे भारत ट्रेनची देशभरात चाचणी घेण्यात आली. प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सज्ज झाली आहे. यातच वंदे भारत स्लीपर ट्रेनचे आणखी एक नवे डिझाइन समोर आले. लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येईल, असा कयास बांधला जात आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या स्लीपर ट्रेनमध्ये आरामदायी व्यवस्था असेल. जेव्हा ट्रेन प्रत्यक्षात धावेल, तेव्हा ती किती किती स्थिर असेल? याची चाचणी घेण्यात आली. सवाई माधोपूर-कोटा-नागदा विभागात एक चाचणी घेण्यात आली. लोको पायलटच्या केबिनमधून एक व्हिडिओ काढण्यात आला.
वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी सुरू असताना, लोको पायलटच्या केबिनमधील एक कर्मचारी चित्रीकरण करत होते. केबिनमधील स्पीडोमीटरच्या अगदी समोर पाण्याचे तीन ग्लास ठेवले आहे. तथापि, ट्रेन १८० किमी प्रति तास वेगाने जात असतानाही, या ग्लासमधील पाण्याचा एक थेंबही सांडला नाही. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या स्पीडोमीटरमध्ये ०-२०० चा वेग दिसत आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग दरम्यान वंदे भारत ट्रेनचा स्पीड १८० किमी प्रतितास गेल्याचे पाहायला मिळत आहे. अंदाजे २७ सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
दरम्यान, वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या या व्हिडिओवर अनेक युझर्स व्यक्त होत आहेत. एकाने पोस्टवर टिप्पणी केली, ही एक मोठी उपलब्धी आहे. अभिनंदन. तरीही, कृपया प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे बारकाईने लक्ष द्या. दुसऱ्याने म्हटले की, ग्लासमधील पाणी सांडले नाही हे पाहून आनंद झाला.
Web Summary : Vande Bharat sleeper train trials achieved 180 kmph. Water remained undisturbed, showcasing stability. Sleeper version expected soon, prioritizing passenger comfort and safety. A test run video went viral.
Web Summary : वंदे भारत स्लीपर ट्रेन परीक्षणों में 180 किमी प्रति घंटा की गति प्राप्त की। पानी स्थिर रहा, जो स्थिरता दर्शाता है। स्लीपर संस्करण जल्द ही आने की उम्मीद है, यात्रियों के आराम और सुरक्षा को प्राथमिकता दी जा रही है। परीक्षण का वीडियो वायरल हो गया।