शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

९ मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान मोदी आज दाखवणार हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 09:05 IST

या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२४ सप्टेंबर) देशवासीयांना नऊ वंदे भारत ट्रेन भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) दोन सेवांसह नऊ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काचीगुडा-यशवंतपूर आणि विजयवाडा-एमजीआर चेन्नई सेंट्रल मार्गांदरम्यान वंदे भारत ट्रेन सेवेचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही सहभागी होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनूसार, काचेगुडा-यशवंतपूर दरम्यानची वंदे भारत ट्रेन सेवा या मार्गावरील इतर गाड्यांच्या तुलनेत सर्वात कमी प्रवास वेळेसह दोन शहरांमधील सर्वात वेगवान ट्रेन असेल. यात ५३० प्रवासी बसण्याची क्षमता आहे. विजयवाडा - एमजीआर चेन्नई सेंट्रल मार्गावरील ट्रेन या मार्गावरील पहिली आणि वेगवान ट्रेन असेल. याशिवाय पश्चिम बंगालला पाटणा-हावडा आणि रांची-हावडा मार्गावर आणि हावडा-कोलकाता या जुळ्या शहरांदरम्यान आणखी दोन वंदे भारत ट्रेन सेवा मिळतील.

पाटणा-झाझा, आसनसोल, बर्दवान, हावडा या मुख्य मार्गावरील ट्रॅक मजबूत करण्याबरोबरच पाटणा-हावडा मार्गावर सेमी-हाय-स्पीड गाड्या चालवण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे निर्मित, ट्रेन सेट 'मेक-इन-इंडिया' उपक्रमाचे प्रतीक आहे आणि भारताच्या अभियांत्रिकी पराक्रमाचे प्रदर्शन करते. अधिकार्‍यांच्या मते, पाटणा-हावडा आणि रांची-हावडा मार्गांसाठी नवीन रेकमध्ये २५ अतिरिक्त वैशिष्ट्ये असतील.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मे २०२३ मध्ये वंदे भारत ट्रेन संदर्भात एक महत्वाची घोषणा केली होती. यामध्ये असे म्हटले होते की, फेब्रुवारी मार्च २०२४ पर्यंत देशात एकूण तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील. वंदे भारत गाड्या १०० टक्के भारतीय तंत्रज्ञानाने बनवल्या आहेत, ज्या शताब्दी, राजधानी सारख्या गाड्या बदलण्यासाठी तयार केल्या जात आहेत. ही ट्रेन चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये तयार केली जात आहे. 

शिक्षण क्षेत्राशी संबंधित ४५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. याशिवाय ते आदिवासी बहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोदेली शहरात एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सचिव विनोद राव म्हणाले, बोडेली येथील मेळाव्याला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी राज्य सरकारच्या 'मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स' उपक्रमांतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स योजनेचा उद्देश शालेय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून, नवीन आणि स्मार्ट वर्गखोल्या आणि संगणक प्रयोगशाळा निर्माण करून राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातमधील अडालज गावात झालेल्या एका कार्यक्रमात ही योजना सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत राज्य सरकार येत्या पाच वर्षांत १०,००० कोटी रुपये खर्च करून सर्व ३५,१३३ सरकारी आणि ५८४७ अनुदानित शाळांचे अपग्रेडेशन करणार आहे. यावेळी राव म्हणाले की, पंतप्रधान राज्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित इतर अनेक नवीन योजनांचा शुभारंभ करतील ज्यात स्वामी विवेकानंद ज्ञान शक्ती निवासी शाळा, रक्षा शक्ती विद्यालय, मुख्यमंत्री ज्ञान सेतू मेरिट शिष्यवृत्ती आणि मुख्यमंत्री ज्ञान साधना मेरिट यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Railwayभारतीय रेल्वे