शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अपघातस्थळावरून धावली वंदे भारत; प्रवासी झाले स्तब्ध, दोन्ही मार्गिकेवरून वाहतूक पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 05:25 IST

दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस ही पहिली प्रवासी रेल्वे घटनास्थळावरून साेडण्यात आली.  

भुवनेश्वर/बालासोर : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातानंतर रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस ही पहिली प्रवासी रेल्वे घटनास्थळावरून साेडण्यात आली.   नुकतेच दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे गाड्या अतिशय हळू जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना घटनास्थळाचे भीषण दृष्य पाहता आले. ते पाहून गाड्यांमधील प्रवासी स्तब्ध झाले. हे पाहणे किती पीडादायक आहे, अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या. अपघातस्थळाचा बहुतांश भाग हिरव्या कपड्याने झाकण्यात आला. दरम्यान, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी कोरोमंडल एक्स्प्रेसच्या दोन्ही लोको पायलटचे जबाब नोंदविले. 

रेल्वेमंत्री बालासोरच्या बहनगा बाजार स्थानकावर बचाव आणि ट्रॅक दुरुस्तीवर लक्ष ठेवून आहेत. ‘आमची जबाबदारी अजून संपलेली नाही. बेपत्ता लोकांना शोधणे हे आमचे ध्येय आहे,’ असे म्हणत ते भावुक झाले. रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम संपल्यानंतर रात्री वाहतूक पूर्ववत झाली. 

मृतदेह पाठविण्याचा खर्च ओडिशा सरकार उचलणार

रेल्वे अपघातातील २७५ मृतांपैकी १७५ जणांची ओळख आतापर्यंत पटविण्यात आली आहे. मृतदेह विविध ठिकाणी पाठिवण्याची साेय ओडिशा सरकार करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव पी. के. जेना यांनी दिली. साेमवारी सायंकाळपर्यंत २४ मृतदेह विविध राज्यांमध्ये पाठिवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

चालक म्हणाला, आम्हाला हिरवा सिग्नल हाेता

रेल्वे मंडळाच्या सदस्या जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले की, आम्ही चालकाशी बाेललाे. ताे शुद्धीवर हाेता. गाडीला हिरवा सिग्नल मिळाला हाेता आणि त्यानुसारच गाडी पुढे नेल्याचे चालकाने सांगितले. हावडा-यशवंतपूर गाडीचा चालक आणि ए १ डब्यातील टीटीईसाेबतही आम्ही बाेललाे. त्यांनी माेठा आवाज ऐकल्याचे सांगितल्याचे सिन्हा म्हणाल्या.

अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसचा जखमी इंजिन चालक गुणनिधी मोहंती आणि त्यांचे सहायक हजारी बेहरा यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर भुवनेश्वरमधील एम्स रग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे मंत्रालयाने या दोघांना पूर्वीच क्लीन चिट दिली आहे.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस