शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णोदेवीला जाणाऱ्या प्रवाशांचे 4 तास वाचवणार वंदे भारत एक्स्प्रेस, अमित शाहांचा हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 12:19 IST

वैष्णोदेवी कटरा येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा आज शुभारंभ झाला आहे.

नवी दिल्लीः वैष्णोदेवी कटरा येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा आज शुभारंभ झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. अमित शाह यांच्याबरोबर रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि इतर मंत्रीही इथे उपस्थित होते. पण वंदे भारत एक्स्प्रेसची नियमित सेवा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या ट्रेननं प्रवास केल्यास प्रवाशांचा चार तासांचा वेळ वाचणार आहे. यासाठी आतापासूनच बुकिंगला सुरुवात झाली आहे.  वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, पीयूष गोयल यांच्या नेतृत्त्वात काम सर्व रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण जम्मू-काश्मीरमधल्या नवरात्रीच्या पवित्र पर्वात रेल्वेनं प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 2014मध्ये मोदी पंतप्रधान बनले, तेव्हापासून सर्वच प्रवाशांना रेल्वे चांगली आणि सुस्थितीत गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवते आहे. रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारनं आतापर्यंत महत्त्वाची पावलं उचलली आहे. सध्याच्या स्थितीत हे अंतर कापण्यासाठी 12 तासांचा कालावधी लागतो. तसेच वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्या यात्रेकरूंच्या मागणीनुसार वाढविण्यात येतील, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस सुरुवातीला आठवड्याला सोमवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे. त्यानंतर यात्रेकरूंची मागणी लक्षात घेऊन आठवड्यातील पाच दिवस सुरू करण्यात येईल. वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते कटरा स्थानकापर्यंत तीन महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. दिल्ली नंतर अंबाला जंक्शन, लुधियाना, जम्मू नंतर कटरा पोहोचणार आहे.  

दे भारत एक्स्प्रेस ची वैशिष्ट्ये....- 'मेक इन इंडिया' योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.- चाचणीदरम्यान या रेल्वेनं ताशी १८० किलोमीटरचा वेग पार केला असून, ती ताशी दोनशे किलोमीटर या वेगानं पळू शकते.- कितीही वेगानं धावली तरी प्रवाशानं भरून ठेवलेली पाण्याची बाटलीही कलंडणार नाही, इतकी या रेल्वेची स्थिरता असेल, असा दावा करण्यात आलाय.- १६ डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे.- या रेल्वेची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे, की प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल.- या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे आणि स्लायडिंग फूटस्टेप्स असतील. प्रवाशांना वेगवान मोफत वायफाय आणि इन्फोटेनमेंट मिळेल.- रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालये. - रेल्वेत एलइडी लाइट्स, मॉड्युलर टॉयलेट्स आणि 'अ‍ॅस्थेटिक टच फ्री बाथरूम्स' असतील, शिवाय अपंगांसाठीही मैत्रीपूर्ण सुविधा असेल.- रेल्वेच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन्स असतील.- जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल.- प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील.- सर्व डबे एकमेकांशी संलग्न असतील.- ऊर्जाबचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.- आणीबाणीच्या प्रसंगी चालक दलाशी थेट संपर्काची यंत्रणा रेल्वेत असेल.- रेल्वेत १६ चेअरकार डबे असतील. त्यातील १४ डबे 'नॉन एक्झिक्युटिव्ह' तर दोन डबे 'एक्झिक्युटिव्ह' असतील. प्रत्येक डब्यातील प्रवाशांची संख्या अनुक्रमे ७८ आणि ५६ असेल.- 'एक्झिक्युटिव्ह' क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असेल आणि रेल्वे ज्या दिशेनं जातेय, त्या दिशेनं आपलं आसन फिरवता येऊ शकेल.

(वंदे भारत एक्स्प्रेसचा वेगळाच असेल थाट! ही वैशिष्ट्ये आहेत खास)

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस