शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

वंदे मातरम् न म्हणणे म्हणजे देशद्रोह नाही-  केंद्रीय मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 12:46 IST

वंदे मातरम् या गीतावरून सुरू असलेल्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतली आहे.

ठळक मुद्दे वंदे मातरम् या गीतावरून सुरू असलेल्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतलीजर एखादी व्यक्ती वंदे मातरम् गात नसल्यास ती व्यक्ती देशद्रोही किंवा राष्ट्रविरोधी असल्याचं ठरवू शकत नाहीमात्र वंदे मातरम् या गीताला विरोध करणं हेसुद्धा चुकीचेच आहे

नवी दिल्ली, दि. 30 - वंदे मातरम् या गीतावरून सुरू असलेल्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतली आहे. वंदे मातरम् हे गीत म्हणणं हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीशी निगडित आहे. जे लोक वंदे मातरम् हे गीत गात नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही. मात्र वंदे मातरम् या गीताला विरोध करणं हेसुद्धा चुकीचेच आहे, असंही नक्वी म्हणाले आहेत. 

केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री नक्वी म्हणाले, वंदे मातरम् गीत म्हणणं एका व्यक्तीच्या आवडीशी संबंधित आहे, मात्र वंदे मातरमला विरोध करणं ही देशभक्ती ठरू शकत नाही. जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् गात नसल्यास ती व्यक्ती देशद्रोही किंवा राष्ट्रविरोधी असल्याचं ठरवू शकत नाही. वंदे मातरम् हे गीत गाणं हे व्यक्तीच्या स्वातंत्र्येचा एक भाग आहे. पण तरीही एखादी व्यक्ती जाणूनबुजून वंदे मातरमला विरोध करत असल्यास ती त्या व्यक्तीची मानसिकता दर्शवते. मुख्तार अब्बास नक्वी यांनी अबू आझमींवर टीकेची झोड उडवली आहे. 

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेत वंदे मातरम म्हणण्यावरून वाद निर्माण झाला होता. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले होते. त्यानंतर राज्याच्या विधानसभेत ‘वंदे मातरम्’चा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. काय झालं विधानसभेत- औचित्याच्या मुद्द्यावर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काल माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. या देशात राहून वंदे मातरम गायला विरोध केला जातोय. या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम म्हणावंच लागेल असं गोटे म्हणाले. यावर आझमींनी उत्तर देण्याची परवानगी मागितली. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. अबू आझमी वेलमध्ये उतरले. दोन्ही बाजूंनी  आमदारांच्या घोषणा सुरू होत्या.  यानंतर आझमी म्हणाले, त्यांनी इतिहासाचा दाखला दिला, देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं,  या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता ? सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत कोणी लिहले ? शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय ? अफजल खानाच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते ? इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते ? त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत असं पसरवू नका, माझ्या म्हणण्याचा चुकिचा अर्थ काढला जात आहे. सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा, हिंदुस्थान झिंदाबादचा नारा आम्ही एकवेळ नाही तर हजारवेळा देऊ, पण वंदे मातरम म्हणणार नाही.यानंतर एकनाथ खडसेंनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् या गीताने झाली आहे.  तर तुम्हाला आक्षेप का? मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला,मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार, इथलेच कफन घ्यावं लागणार, इथलीच हवा, इथलेच पाणी फुकट मिळतं मग त्या मातीला नमन करायला, या देशाला सलाम करायला काय अडचण आहे ? असं म्हणत खडसे यांनी इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहना होगा असं ठणकावलं.