शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेटाईन डे स्पेशल, मोदींच्या गुजरातमध्ये 'सिंगल्सना मोफत चहा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 18:38 IST

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होताच, सर्वच गिफ्ट शॉफी, कॅफे आणि रेस्टॉरंटकडून कपल्ससाठी ऑफर्स दिल्या जातात.

अहमदाबाद - चहा स्टॉल आणि प्रसिद्ध कॅफे मालकांकडून व्हॅलेंटाईन डेसाठी भन्नाट आयडिया आणि पॅकेज देण्यात येत आहे. यंदाचा व्हॅलेंटाईन आपल्या प्रियसोबत साजरा करण्यासाठी गुजरातमध्ये कॅफे चालकांनी ऑफर दिल्या आहेत. तर, अहमदाबादमधील एका कॅफे चालकाने तर चक्क मोफत चहा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, एमबीए चायवाला नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रफुल्ल बिल्लोरे यांनी फेसबुकवर याबाबतचे पेजही तयार केले आहे. 

'MBA Mr. बिल्लोरे अहमदाबाद चायवाला' या कॅफेमालकाने व्हॅलेंटाईन डे दिवशी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत सिंगल लोकांसाठी मोफत चहा देण्याची घोषणा केली आहे. अहमदाबादच्या वस्त्रापूर येथे प्रफुल्ल बिल्लोरे याचे चहाचे दुकान आहे. 25 जून रोजी प्रफुल्ल यांनी रस्त्यावरच या चहाच्या दुकानाची सुरूवात केली होती. केवळ 8 हजार रुपयांच्या भाग भांडवलावर हा चहाचा स्टॉल सुरू करण्यात आला होता. त्यावेळी, कुटुंबीय आणि नातेवाईंनी अनेक टोमणे मारले होते. मात्र, दोन वर्षांच्या मेहनतीनंतर प्रफुल्ल यांचे एमबीए चायवाला हे चहाचे दुकान अत्यंत फेमस बनले आहे. तर आता, या चहाच्या स्टॉलचे रुपांतर एक कॅफेमध्ये झाले असून येथे चहासोबत स्नॅक्सही मिळतो. 

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होताच, सर्वच गिफ्ट शॉफी, कॅफे आणि रेस्टॉरंटकडून कपल्ससाठी ऑफर्स दिल्या जातात. मात्र, सिंगल तरुणांना कुणीही ऑफर देत नाही, सिंगल लोकांची कुणालाही काळजी नाही. त्यामुळे मी व्हॅलेंटाईन डे दिवशी सिंगल असणाऱ्या तरुण आणि तरुणींसाठी मोफत चहा देण्याची कल्पना मला सुचली. त्यानुसार मी ही कल्पना यंदाच्या व्हॅलेंटाईन डेपासून अमलात आणणार असल्याचं 22 वर्षीय प्रफुल्ल याने म्हटले. मात्र, सिंगल कोण हे कसे ओळखणार याबाबत प्रफुल्लने म्हटले की, तसं ओळखण कठीण आहे. त्यामुळे जो कोणी सिंगल म्हणून कॅफ शॉपला येईल, त्यास चहा मोफत दिला जाईल. तर, ही गर्दी आटोक्यात राहावी म्हणूनच सायंकाळी 7 ते 10 या वेळेतच ही सुविधा सवलत देण्यात आली आहे. दरम्यान, एमबीए चायवाला प्रफुल्लच्या कॅफेत 35 वेगवेगळ्या प्रकारचा चहा आणि स्नॅक्स मिळतो. त्यामध्ये, बनमस्का, मॅगी, ब्रेड बटर, सँडवीच, फ्रेंच फ्राईस या पदार्थांचा समावेश आहे. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेGujaratगुजरात