नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपांमध्ये अडकलेले काँँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा हे कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे हादरले आहेत. वड्रा यांनी राजस्थानमधील चार कंपन्या बंद केल्या असून, आणखी दोन कंपन्यांचाही ते लवकरच गाशा गुंडाळणार आहेत.काँग्रेस मित्रपक्षांच्या यूपीए सरकारच्या काळात रॉॅबर्ट वड्रा यांनी राजस्थान आणि हरियाणात कवडीमोल भावाने जमिनी घेऊन बड्या कंपन्यांना विकूून कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप आहे. २0११ मध्ये डीएलएफ कंपनीबरोबर त्यांनी केलेला सौदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.वड्रा यांनी जमिनींचे बहुतांश व्यवहार हरियाणा आणि राजस्थानात केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही राजस्थान आणि हरियाणात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. दोन्ही राज्यांत आता भाजपाचे सरकार आहे. वड्रांच्या गैरव्यवहारांच्या चौकशीची शक्यता आहे. त्यामुळे हादरलेल्या वड्रा यांनी आपल्या कंपन्यांचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
वड्रा यांची कंपन्या बंद करण्याची लगबग
By admin | Updated: November 8, 2014 04:06 IST