शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

न्यू ईअरच्या जल्लोषासाठी पोलिसांकडून ड्रेस कोड, न पाळल्यास होणार तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 15:42 IST

मुली छोटे छोटे कपडे घालून तरुणांना आकर्षित करत असल्यानं छेडछाडीसारख्या घटना घडत असल्याचा आरोप समाजातील काही लोक करत असतात.

ठळक मुद्देमुली छोटे छोटे कपडे घालून तरुणांना आकर्षित करत असल्यानं छेडछाडीसारख्या घटना घडत असल्याचा आरोप समाजातील काही लोक करत असतात. गुजरातमधल्या बडोद्यामध्ये पोलीस आयुक्तांनी नव वर्षाच्या पार्टीमध्ये तरुणींना छोटे, तोकडे कपडे घालण्यास मज्जाव केला आहे.मुलगा आणि मुलगी आक्षेपार्ह परिस्थितीत सापडल्यास पोलीस त्यांना अटकही करू शकतात.  

अहमदाबाद- मुली छोटे छोटे कपडे घालून तरुणांना आकर्षित करत असल्यानं छेडछाडीसारख्या घटना घडत असल्याचा आरोप समाजातील काही लोक करत असतात. परंतु गुजरातमधल्या बडोद्यामध्ये पोलीस आयुक्तांनी नव वर्षाच्या पार्टीमध्ये तरुणींना छोटे, तोकडे कपडे घालण्यास मज्जाव केला आहे. तसेच मुलगा आणि मुलगी आक्षेपार्ह परिस्थितीत सापडल्यास पोलीस त्यांना अटकही करू शकतात.

नववर्षाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी पार्टी आयोजित केल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर बडोद्यातील तरुणींना पोलिसांनी इशारा दिला आहे. छोटे आणि तोकडे कपडे घालून रस्त्यावर फिरताना कोणतीही तरुणी आढळल्यास पोलीस तिच्यावर कारवाई करणार आहेत. पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांनी याबाबत एक परिपत्रकही जारी केलं आहे. या परिपत्रकात तरुणींनी छोटे आणि तोकडे कपडे न घाल्याचा सल्ला देण्यात आला आहे. गुजरातमधली सांस्कृतिकनगरी असं नामाभिधान असलेल्या बडोद्यातील आयुक्तांनी तरुणींना तोकडे आणि अंगाला तंग असणारे कपडे घालून 31 डिसेंबरच्या पार्टीमध्ये सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचे कपडे घालून पार्टीमध्ये एखादी तरुणी आढळल्यास पोलीस तिच्यावर कारवाई करणार आहेत.इतकंच नव्हे, तर तरुण-तरुणी आक्षेपार्ह परिस्थितीत आढळल्यास त्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. पोलिसांनी पार्टीच्या आयोजकांना हॉटेल, पार्टी प्लॉट आणि रेस्टॉरंटमध्ये न्यू ईअर पार्टीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून नववर्षाच्या कार्यक्रमांवर नजर ठेवता येणार आहे. दुसरीकडे मुलींसाठी शाळा, कॉलेज, मंदिर आणि नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे या ड्रेस कोडला बडोद्यातून विरोध होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Gujaratगुजरात