शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

काेराेना राेखण्यासाठी फेब्रुवारीपासून लसीकरण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 6:46 AM

आज बैठक; पंतप्रधान नरेंद्र माेदी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : येत्या फेब्रुवारी महिन्यापासून देशात कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याच्या मोहिमेस सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य खात्याने कोविन अ‍ॅपही तयार केले आहे. लसीच्या वितरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी चर्चा करणार आहेत.  

देशातील आठ राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी नरेंद्र मोदी मंगळवारी स्वतंत्रपणे चर्चा करतील. त्यानंतर दुसऱ्या बैठकीत लसीच्या वितरणाबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान माेदी संवाद साधतील.

 फायझर, मॉडेर्नापेक्षा स्पुटनिक व्ही स्वस्तnरशियाच्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत मॉडेर्ना, फायझर कंपनीच्या लसींपेक्षा खूपच कमी असेल असे त्या देशाने म्हटले आहे. nमॉडेर्ना लसीची किंमत २५ ते ३७ डॉलरच्या दरम्यान तर फायझर कंपनीची कोरोना लस १९.५० डॉलरला मिळेल. nस्पुटनिक व्ही या लसीची किंमत त्यापेक्षा कमी असणार आहे. अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाला ११ किंवा १२ डिसेंबरपासून सुरूवात होण्याची शक्यता आहे.

विविध कंपन्या ही लस विकसित करत आहेत. मात्र आॅक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी विकसित करत असलेल्या कोविशिल्ड या लसीवर भारतातील वैद्यकीय तज्ज्ञांचा अधिक भरवसा आहे. nकोविशिल्ड लस फेब्रुवारीत तर भारत बायोटेक बनवत असलेली कोवॅक्सिन ही लस एप्रिलमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.nअ‍ॅस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड लस ७० ते ९० टक्के परिणामकारक असून ती रेफ्रिजेटरमध्ये ठेवता येईल. तिच्या साठ्यासाठी फ्रीझरची गरज नाही ही भारतासाठी सुवार्ताच आहे. nकोविशिल्ड लसीची साठवणूक २ ते ८ अंश सेल्सियस तापमानामध्ये करता येते. त्याउलट फायझर, मॉडेर्ना यांच्या कोरोना लसी शून्यापेक्षा कमी तापमानामध्ये ठेवणे अनिवार्य आहे.

७०-९०%

परिणामकारक कोविशिल्ड लस 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी