शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाची बातमी! १२ ते १७ वर्षांच्या मुलांचे लसीकरण ऑक्टोबरपासून; व्याधीग्रस्त कुमारांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 08:03 IST

देशात १८ वर्षांखालील मुलांची संख्या सुमारे ४४ कोटी आहे. त्यातील १२ ते १७ या वयोगटातील मुलांना प्राधान्याने लस देण्याची तयारी सरकारने चालवली आहे.

हरिश गुप्ता -

नवी दिल्ली : सुमारे देशातील ८० कोटी लोकांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असून, या महिनाअखेर हा आकडा १०० कोटींच्या घरात गेलेला असेल. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून १२ ते १७ वयोगटातील मुलांना लसीचा पहिला डोस देण्याची घोषणा केंद्र सरकार लवकरच करेल, असे सांगण्यात येते.

देशात १८ वर्षांखालील मुलांची संख्या सुमारे ४४ कोटी आहे. त्यातील १२ ते १७ या वयोगटातील मुलांना प्राधान्याने लस देण्याची तयारी सरकारने चालवली आहे. इन्सॅकॉग (सार्स व कोविड संबंधीची देशातील सर्वोच्च सरकारी संस्था) व कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष प्रा. एन. के अरोरा यांनी सांगितले ही या वयोगटातील मुलांद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांना प्राधान्याने लस दिली जाईल. लहान मुलांमध्ये कोरोनाचा फारसा संसर्ग झाला नसल्याचे आतापर्यंतच्या सिरो सर्व्हे मधून आढळून आले आहे. मात्र प्रौंढातील मोठ्या वर्गाचे लसीकरण झाले असल्याने १२ ते १७ या वयांच्या मुलांना आधी लस देण्याचा मानस आहे.

कोणत्या ना कोणत्या व्याधी असलेल्या वा अशा व्याधींची शक्यता असलेल्या मुलांना आधी लस देण्यात येईल, असे प्रा. अरोरा म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, एरवीही लहान मुलांमध्ये मोठे आजार व त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमीच असते. त्यामुळे त्यांच्याऐवजी पालकांच्या सुरक्षिततेकडे आधी लक्ष देण्यात आले, त्यांना आधी लस देणे सुरू झाले.

झायकोव-डी लस देणार- देशात १२ ते १७ या वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले असून, त्यातील जेमतेम १ टक्का मुलांना अन्य व्याधी आहेत. ही संख्या सुमारे ४० लाख असावी, असा सरकारचा होरा आहे. त्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मोफत लस देण्यास सुरुवात होईल. - औषध महानियंत्रकांनी झायडस कॅडिलाच्या झायकोव-डी लसीच्या आपत्कालीन वापराला २० ऑगस्ट रोजी परवानगी दिली आहे. भारतात १२ वर्षांवरील मुलांना दिली जाणारी ही पहिली लस असेल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस