शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेच्या खासदार पी.टी उषा यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; अचानक झालं पतीचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:31 IST

नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर पी.टी उषा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती

तिरुवनंतपुरम - भारतीय ऑलंपिक संघाच्या अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार पी.टी उषा यांचे पती वी श्रीनिवासन यांचं शुक्रवारी निधन झालं. श्रीनिवासन हे त्यांच्या पेरुमलपुरम येथील घरी रात्री १ च्या सुमारास पडले होते. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना अशा वेळी झाली जेव्हा पी.टी उषा मतदारसंघातून परतत होत्या, त्या घरी नव्हत्या. 

पी.टी.उषा यांचे पती श्रीनिवासन हे ६७ वर्षांचे होते. वी. श्रीनिवासन यांचा जन्म कुट्टिक्काड पोन्नानीच्या वेंगाली थारवाद येथे नारायणन आणि सरोजिनी यांच्या घरी झाला. ते सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स(CISF) मध्ये उपअधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. १९९१ साली पी.टी उषा यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. हे दोघेही एकमेकांच्या नातेसंबंधात होते. पतीच्या अचानक निधनाने पी.टी उषा यांना मोठा धक्का बसला आहे.

 श्रीनिवासन हे शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी चक्कर येऊन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. केंद्र सरकारचे माजी कर्मचारी श्रीनिवासन हे पी.टी उषा खेळ आणि राजकीय कारकि‍र्दीत कायम त्यांच्यासोबत उभे राहिले. पी.टी उषा यांच्या यशामागे पती श्रीनिवासन यांची प्रेरणा होती. या जोडप्याला उज्ज्वल नावाचा एक मुलगाही आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी श्रीनिवासन यांच्या मृत्यूनंतर पोस्ट करत पी.टी उषा यांचे सांत्वन केले आहे.

अजित पवारांच्या निधनावर व्यक्त केला होता शोक

नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर पी.टी उषा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. अजित पवार हे महाराष्ट्र ऑलंपिक संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या जाण्याने क्रीडा विश्वातही शोक व्यक्त केला जात आहे. याबाबत पी.टी उषा यांनी त्यांच्या पोस्टवर अजित पवारांचा रायफल शुटींग करतानाचा फोटो टाकत त्यांच्या कुटुंबाविषयी संवेदना मांडल्या होत्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : PT Usha's Husband, V. Srinivasan, Passes Away; Mourning in Sports World

Web Summary : Indian Olympic Association President PT Usha's husband, V. Srinivasan, died at 67. A former CISF officer, he collapsed at home and was rushed to the hospital but could not be saved. Srinivasan was a constant support to Usha throughout her career. The couple has a son.