नांदूरशिंगोटे येथे व्ही. एन. नाईक यांना अभिवादन
By admin | Updated: December 14, 2015 19:11 IST
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांना जयंती व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील रेणुकामाता सभागृहात क्रांतिवीर वसंतराव नाईक पतसंस्थेच्या वतीने आयोजित व माजी सरपंच पी. डी. सानप यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. व्यासपीठावर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण शेळके, व्ही. एन. नाईक शिक्षण ...
नांदूरशिंगोटे येथे व्ही. एन. नाईक यांना अभिवादन
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांना जयंती व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील रेणुकामाता सभागृहात क्रांतिवीर वसंतराव नाईक पतसंस्थेच्या वतीने आयोजित व माजी सरपंच पी. डी. सानप यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. व्यासपीठावर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण शेळके, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक विनायक शेळके, सरपंच पांडुरंग आगिवले, संस्थेचे उपाध्यक्ष प्रारब्ध शेळके, मनोहर पाटील, भाऊपाटील शेळके, नामदेव शेळके, एस. एम. शेळके, डॉ. राधाकृष्ण सांगळे, अनिल नवले, मुख्याध्यापक एस. डी. शिरसाठ आदि उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नाईक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.नाईक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सायमन कमिशनला विरोध, इंटकचे अध्यक्षपद व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य याबाबत सानप यांनी माहिती दिली. नानासाहेब घुले, विनायक शेळके, संजय शेळके, एस. एम. शेळके, स्वाती शेळके, सोनल कुटे यांचीही भाषणे झाली. या प्रसंगी गोपाळ शेळके, दीपक बर्के, रवींद्र शेळके, गणेश घुले, कैलास बर्के, निवृत्ती शेळके, बाळासाहेब आव्हाड, श्रीकांत वाक्चौरे, सोपान मंडलीक, बाळासाहेब कांगणे आदिंसह ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. पी. के. शेळके यांनी सूत्रसंचालन केले. व्यवस्थापक नजीर शेख यांनी आभार मानले. (वार्ताहर)