शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

व्ही. के. शशिकलांना महासचिव पदावरून हटवलं, AIADMKचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:21 IST

तामिळनाडूच्या राजकारणातून शशिकलांना जवळपास बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला आहे. AIADMKनं मंगळवारी व्ही. के. शशिकला यांना पार्टीच्या महासचिवपदावरून हटवलं आहे. त्यांचं महासचिवपद काढून घेण्यात आलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी बोलावलेल्या जनरल काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

चेन्नई, दि. 12 - तामिळनाडूच्या राजकारणातून शशिकलांना जवळपास बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला आहे. AIADMKनं मंगळवारी व्ही. के. शशिकला यांना पार्टीच्या महासचिवपदावरून हटवलं आहे. त्यांचं महासचिवपद काढून घेण्यात आलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी बोलावलेल्या जनरल काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, शशिकलाचे भाचे आणि खासदार टीटीव्ही दिनाकरन यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.तत्पूर्वी तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी एक बैठक घेतली होती. दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवणे हाच या बैठकीचा उद्देश होता. तसेच शशिकला आणि दिनाकरन यांनी घेतलेले निर्णय हे पक्षाला लागू होणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच दिनाकरन यांना पाठिंबा देणा-या 14 आमदारांनी बहुतम सिद्ध करण्याची मागणी केली असून, त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली आहे. शशिकला उत्पन्नाहून अधिक संपत्ती जमवल्यामुळे तुरुंगात आहे. तर दिनाकरन यांना लाच दिल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय. दिनाकरनवर पक्षाच्या चिन्हासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. तर प्रकृती अस्वास्थ्यापायी शशिकलांचे पती रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी व माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम गटांचे विलीनीकरण झाले आहे. सरचिटणीस शशिकला यांना पदावरून व पक्षातून दूर करण्याबाबतही त्यांच्यात एकमत झाले आहे.

समझोत्याचा भाग म्हणून पक्षाचे समन्वयक म्हणून पनीरसेल्वम यांना नेमण्यात आले असून, मुख्यमंत्री उपसमन्वयक असतील. त्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही शपथविधी पार पडला. पनीरसेल्वम यांच्याकडे अर्थ खात्याबरोबरच गृहनिर्माणाशी संबंधित चार खाती तसेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहर नियोजन ही खाती देण्यात आली आहेत. त्यांचे विश्वासू के. पांडियराजन यांचाही शपथविधी पार पडला. याशिवाय पनीरसेल्वम गटाला आणखी मंत्रिपदे मिळणार आहेत. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्षाचा ताबा घेतल्यामुळे आणि पनीरसेल्वम यांना दूर करून पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात फूट पडली होती. पण आता त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पक्षात कोणतेही स्थान असणार नाही.