शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

'आता शर्टवरही नावं लिहायची का?", युपीतील 'नेमप्लेट' वादावर NDA तील घटक पक्षांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 14:03 IST

केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी या आदेशावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Uttar Pradesh BJP : उत्तर प्रदेशातील योगी सरकारने (Yogi Adityanath) कांवड यात्रेच्या (Kanwar Yatra) मार्गांवरील सर्व दुकानदारांना त्यांच्या दुकनावर स्वतःचे नाव लिहिण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांसोबतच NDA तील मित्रपक्षांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. JDU आणि LJP नंतर आता राष्ट्रीय लोकदलानेही (RLD) या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. 

आरएलडी प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांनी मीडियाशी संवाद साधताना या आदेशावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आता कुठं-कुठं नावं लिहावीत? आता काय आपल्या शर्टवरही नावं लिहायची का? कांवड प्रवाशांची सेवा सर्व जाती-धर्मातील लोक करतात. कांवड यात्रा घेऊन जाणारेही कोणत्या व्यक्तीला त्याची ओळख विचारत नाहीत. हा मुद्दा धर्माशी जोडला जाऊ नये. राज्यातील भाजप सरकारने फार विचार करुन आदेश जारी केलेला नाही. त्यामुळे आता सरकार काय निर्ण घेणार, हे पाहणे महत्वाचे आहे. सरकारला निर्णय मागे घेण्यासाठी अजून वेळ आहे," अशी प्रतिक्रिया जयंत चौधरी यांनी दिली. 

काय आहे योगी सरकारचा आदेश?योगी सरकारने कांवड मार्गावरील सर्व दुकानदारांना आपल्या दुकानांवर स्वतःचे नाव लिहिण्याचा आदेश जारी केला आहे. आपण कोणाच्या दुकानातून माल घेत आहोत, हे कांवड यात्रेकरुंना कळावे, हा यामागाच उद्देश आहे. सीएमओच्या म्हणण्यानुसार, कांवड यात्रेकरुंच्या श्रद्धेची शुद्धता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या आदेशानंतर कांवड मार्गावरील सर्व दुकानांवर मालकाची नावे दिसत आहे. पण, आता या निर्णयामुळे राज्यातील हिंदू-मुस्लिम राजकारण तापले आहे. विरोधक हा निर्णय राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे म्हणत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा