उत्तरकाशीच्या धराली गावात ढगफुटीमुळे झालेला विध्वंसात सर्व काही संपलं आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोकांच्या किंकाळ्या, ओरडणं स्पष्टपणे ऐकू येतं. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. धरालीजवळील मुखाबा गावातील लोकांनी हे भयानक दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावरही काटा आला.
मुखाबा गावातील स्थानिक रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शी सुभाष चंद्र सेमवाल म्हणतात की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही इतकं भयानक दृश्य पाहिलं नव्हतं. दुपारची वेळ होती. त्यांना वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू आला. दगड वेगाने खाली येत होते. त्यानंतर ते आणि त्यांच्या कुटुंबातील इतर लोक बाहेर आले. आम्ही पाहिलं की खीर गंगा नदीचं पाणी वेगाने खाली येत होतं. आम्ही सर्वजण घाबरलो. आम्ही धारली बाजारपेठेतील लोकांना सावध करण्यासाठी शिट्ट्या वाजवल्या आणि त्यांना शक्य तितक्या लवकर तेथून पळून जाण्यास सांगितलं. आम्ही बराच वेळ ओरडत राहिलो.
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
सेमवाल भावुक होतात आणि म्हणतात की, आमचा आवाज ऐकून बरेच लोक हॉटेलमधून बाहेर पडले पण वेगाने वाहणाऱ्या पाण्याने सर्वांना वेढलं. त्याच घटनेच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये लोक घाबरून पळून त्यांच्या नातेवाईकांना बोलावताना दिसत आहेत. सर्व काही संपलं असं म्हणत आहेत. याच परिसरात अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि होमस्टे आहेत. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आयएसबीटीच्या तुकड्या बचावकार्य करत आहेत.
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
लष्कराचा हर्षिल कॅम्प देखील घटनास्थळापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. सोशल मीडियावर लष्कराने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सर्वत्र कचरा दिसतो. लोकांना आपत्तीग्रस्त धरालीपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याच दरम्यान, एसडीआरएफशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, ५० जवानांची एक तुकडी मदत आणि बचावकार्यात गुंतली आहे.
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
एनडीआरएफच्या चार तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. याशिवाय आयटीबीपीच्या तीन तुकड्या देखील मदत कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकार परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासन लोकांना नदीपासून दूर राहण्याचं आवाहन करत आहे. राज्य सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी ढिगारा आणि दगड पडले आहेत. याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.