शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

मृत्यूशी झुंज! 48 तासांनंतरही बोगद्यात अडकलेत 40 मजूर; जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 10:58 IST

48 तास उलटले तरी अद्याप कामगारांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी विविध मार्गांनी संपर्क साधला जात आहे.

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना वाचवण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, 48 तास उलटले तरी अद्याप कामगारांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी विविध मार्गांनी संपर्क साधला जात आहे. बचाव कार्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व कामगार सुरक्षित असल्याचं मदतकार्य करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे.

बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न वेगाने करण्यात येत आहेत. हा बोगदा बांधणाऱ्या कंपनीने म्हटलं आहे की, बोगद्याच्या आतून 'शॉटक्रेटिंग' (काँक्रीट स्प्रे) टाकून माती काढली जात आहे. तर 'हायड्रॉलिक जॅक'च्या मदतीने आतमध्ये 900 मिमी व्यासाचा स्टील पाइप टाकण्याची योजना आखली जात आहे, जेणेकरून बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवता येईल. आपत्ती व्यवस्थापन सचिव रणजीत कुमार सिन्हा यांनी सांगितलं की, बचाव कार्य लवकरच पूर्ण केले जाईल आणि सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढलं जाईल.

48 तासांत आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

- 25 मीटरपर्यंत मातीचा ढिगारा हटवण्यात आला.- 40 मजुरांपर्यंत अन्न पोहचवण्यात आलं.- ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आलं. - खोदकाम सुरू असताना काही भाग कोसळला.- पीएम नरेंद्र मोदींनी सीएम पुष्कर सिंह धामी यांच्याकडून माहिती घेतली.- हायड्रॉलिक जॅकद्वारे स्टील पाईप टाकण्यात येत आहे.- पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.- एनडीआरएफ-एसडीआरएफ टीम घटनास्थळी आहेत.- वॉकीटॉकीच्या माध्यमातून मजुरांशी संवाद साधला.

उत्तरकाशी बोगद्यात सुरू असलेल्या बचाव मोहिमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत. सलग दुसऱ्या दिवशी मोदींनी सीएम पुष्कर सिंह धामी यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला. सीएम धामी देखील घटनेची माहिती घेत आहेत. सीएम धामी दुर्घटनेच्या 24 तासांनंतर सोमवारी घटनास्थळी पोहोचले.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडNarendra Modiनरेंद्र मोदी