शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"आमची अवस्था खूप वाईट, आम्हाला लवकर बाहेर काढा"; बोगद्यात अडकलेल्या मजुराची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 14:34 IST

पाईपद्वारे अधिकार्‍यांशी बोलताना मजुरांनी त्यांना लवकरात लवकर वाचवण्याची विनंती केली आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगदा दुर्घटनेत 41 मजूर अजूनही अडकले आहेत. 12 नोव्हेंबर रोजी बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. बचाव पथकाला अद्याप कोणतंही यश मिळालेलं नाही. त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता वाढत आहे.

पाईपद्वारे अधिकार्‍यांशी बोलताना मजुरांनी त्यांना लवकरात लवकर वाचवण्याची विनंती केली आहे. उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी अरुण कुमार यांच्यांशी मजुरांनी संवाद साधला. जे संभाषण झाले ते खूप चिंताजनक होतं. या बोगद्यात उत्तर प्रदेशातील 8 मजूरही अडकले आहेत. या मजुरांनी अरुण कुमार यांना येथील स्थिती अत्यंत वाईट असून त्वरीत बाहेर काढण्यास सांगितलं आहे.

"काळजी करू नका, हिंमत ठेवा"

मजुराशी संवाद साधताना अरुण कुमार त्यांना हिंमत देत म्हणाले, "काळजी करू नका, धीर धरा. संपूर्ण देश तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. बचाव कार्य लवकरच यशस्वी होईल आणि आपण सर्व एकत्र घरी जाऊ." त्याचवेळी या संभाषणात उत्तर प्रदेशातील एका मजुराने अरुण कुमार यांना सांगितलं की, आम्हाला जेवण मिळत आहे, पण आम्हा सर्वांची अवस्था खूप वाईट आहे. बचाव कार्य कसं सुरू आहे? आम्हाला लवकर बाहेर काढा. दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे.

आणखी एक मजूर राम सुंदरने आमच्या कुटुंबातील सदस्यांना काळजी करू नका आणि स्वतःची काळजी घेण्यास सांगा असं म्हटलं आहे. या बोगद्यात विविध राज्यातील कामगार अडकले आहेत. या राज्यांच्या सरकारांनी त्यांचे प्रतिनिधी रेस्क्यू एजन्सीशी संवाद साधण्यासाठी पाठवले आहेत. अरुण कुमार मिश्रा हे त्यापैकीच एक आहेत, ज्यांना उत्तर प्रदेश सरकारने मजुरांची अवस्था आणि बचाव कार्याची चौकशी करण्यासाठी पाठवलं आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड