शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य ठरणार उत्तराखंड! 'या' महत्वाच्या गोष्टींचा असणार समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 13:09 IST

जर हा कायदा लागू झाला, तर उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर UCC लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरेल.

उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेचा (यूसीसी) मसुदा तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने शुक्रवारी आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासमोर सादर करण्यात आला. धामी सरकारने UCC वर विधेयक मंजूर करण्यासाठी 5 फेब्रुवारीपासून विधानसभेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. विधानसभेत हे विधेयक मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात या मसुद्यावर चर्चा होईल.

UCC ड्राफ्टमध्ये काय काय? -- घटस्फोटासाठी सर्व धर्मीयांसाठी समान कायदा असेल.- घटस्फोटानंतर पालनपोषणाचा नियम समान असेल.- दत्तक घेण्यासाठी संदर्भात सर्व धर्मांसाठी समान कायदा असेल.- संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार सर्व धर्मासाठी लागू असेल. - मुलीने दुसऱ्या धर्मात अथवा जातीत लग्न केले, तरी तिचा हक्क कायम राहील.- सर्व धर्मात मुलेचे विवाहाचे वय 18 वर्ष असणे अनिवार्य असेल. - लिव्ह इन रिलेशनशिपसाठी नोंदणी आवश्यक असेल.- राज्यातील अनुसुचित जमाती या कायद्यात येणार नाहीत.- एक पती-पत्नीचा नियम सर्वांना लागू होईल.

2022 च्या विधानसभा निवडणुकीवेळी करण्यात आली होती घोषणा - उत्तराखंडमध्ये UCC संदर्भात कायदा तयार करणे आणि राज्यात त्याची अंमलबजावणी करणे, हे देखील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जनतेला दिलेल्या मुख्य आश्वासनांपैकी एक आश्वासन होते. यानंतर मार्च 2022 मध्ये भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत UCC चा मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या स्थापनेला मान्यता दिली. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

उत्तराखंड ठरेल पहिलं राज्य - जर हा कायदा लागू झाला, तर उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर UCC लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरेल. गोव्यात पुर्तगिजांच्या राजवटीपासूनच हा कायदा लागू आहे. UCC अंतर्गत राज्यात सर्व धर्मियांसाठी विवाह, घटस्फोट, जमीन, संपत्ती आणि उत्तराधिकारासंदर्भात एकच कायदा असेल.

कायद्यात सुधारणा होईल -कायदा तज्ज्ञांच्या मते, यूसीसी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होईल. यासंदर्भात बोलताना उत्तराखंडचे माजी DGP अशोक कुमार म्हटले, सिव्हिल कायद्यांमध्ये काही बदल होणे आवश्यक आहे. आपण अनेक वेळा महिलांना अत्यंत असहाय्य बघितले आहे. महिलांसाठी यूसीसी अत्यंत उपयोगाचे आहे. लिव्ह इन रिलेशनशिपसाठीही नोंदणी आवश्यक असेल. जेणेकरून गुन्हेगारीचा ग्राफ आणि गुन्हेगारीचे प्रमाण यावरही नियंत्रण मिळवता येईल.

 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडUniform Civil Codeसमान नागरी कायदाBJPभाजपा