शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Uttarakhand Glacier Burst: देवभूमीत जलप्रकोप! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने महापूर; १७०हून अधिक बेपत्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 07:03 IST

Uttarakhand Glacier Burst: ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला; १० जणांचे मृतदेह सापडले

डेहराडून : उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे रविवारी सकाळी नंदादेवी हिमशिखराचा हिमकडा कोसळून धौलीगंगा, ऋषीगंगा व अलकनंदा या नद्यांना महापूर आला. यात संपूर्ण ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. तेथील १७०हून अधिक कर्मचारी बेपत्ता आहेत. त्यापैकी १० जणांचे मृतदेह हाती लागले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बेपत्ता कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) व आयटीबीपीच्या जवानांनी बचावकार्य हाती घेतले आहे. हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढून परिसरातील पाच पूल वाहून गेले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर केली. पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून या कुटुंबीयांना २ लाखांची तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. (वृत्तसंस्था)उपचारांसाठी वैद्यकीय यंत्रणाही सज्जऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पातील वाहून गेलेल्या कर्मचाऱ्यांना शोधल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावेत म्हणून जोशीमठ येथे ३० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. तसेच डेहराडून, श्रीनगर, हृषिकेश येथील रुग्णालयांमधील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.अतिशय दुर्दैवी घटना : पंतप्रधानपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या महापुरामध्ये ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पातील दीडशेहून अधिक कर्मचारी वाहून गेले ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या नैसर्गिक आपत्तीत सारा देश उत्तराखंडच्या पाठीशी उभा आहे.बोगद्यातून १६ जणांना सुखरूप बाहेर काढलेऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या एका बोगद्यात काम करीत असलेले सुमारे ५० कर्मचारी या प्रकोपामुळे तिथेच अडकून पडले होते. हे सारे जण मरण पावले असण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु आयटीबीपीच्या जवानांनी यातील १६ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. अन्य कर्मचाऱ्यांच्या शोध सुरू आहे. पाच जिल्ह्यांत सतर्कतेचा इशाराचामोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून महापूर आल्याने उत्तराखंडमधील पौरी, तेहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार, डेहराडून या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. अलकनंदा नदीतील पाण्याचीही पातळी वाढल्याने तिथेही सतर्कतेच्या सूचना आहेत. 

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा