शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Glacier Burst: वाचण्याची आशाच सोडली; पण तितक्यात मोबाईल नेटवर्क काम करू लागलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 07:25 IST

Uttarakhand Glacier Burst: बहादूर यांच्यासह त्यांचे ११ सहकारी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी चामोली जिल्ह्यात भूमिगत बोगद्यातून वाचविले. 

जोशीमठ (उत्तराखंड) : जिवंत राहण्याची आशा त्यांनी सोडून दिली होती. तेवढ्यात त्यांच्यापैकी एकाच्या मोबाइल फोनचे नेटवर्क काम करू लागले व त्यातून त्यांना अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आला. त्यांनी तपोवन या भूमिगत बोगद्यातून त्यांना वाचविले. हा बाेगदा चामोलीत आहे.“बोगद्यातून बाहेर या, असे लोक आमच्यावर ओरडत होते, हे आम्ही ऐकले, परंतु आम्ही काही करायच्या आधीच पाण्याचा मोठा लोंढा आणि चिखल आमच्यावर आदळला,” असे तपोवन वीज प्रकल्पाचे वाचविण्यात आलेले कामगार लाल बहादूर म्हणाले. बहादूर यांच्यासह त्यांचे ११ सहकारी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी चामोली जिल्ह्यात भूमिगत बोगद्यातून वाचविले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे लोक शेवटच्या व्यक्तीला वाचविण्यात आले, तेव्हा जवळपास सात तास (सकाळी दहा ते सायंकाळी पाच) तेथे अडकून पडले होते. आयटीबीपीने या मोहिमेचा रेकॉर्डेड व्हिडीओ प्रसारमाध्यमांना दिला. या लोकांवर सध्या जोशीमठ येथील आयटीबीपीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना घडली तेथून हे रुग्णालय २५ किलोमीटरवर आहे. ११ मृतदेह सापडले असून, २०२ जण बेपत्ता आहेत. पाण्याचा जोरदार प्रवाह बोगद्यात आला, तेव्हा आम्ही ३०० मीटर्स खोलवर होतो. आम्ही तर अडकून पडलो होतो, परंतु आयटीबीपीने आम्हाला वाचविले, असे नेपााळचा रहिवासी बसंत याने सांगितले.  धाक (चामोली) खेड्यातील एक कामगार तपोवन प्रकल्पात कामाला होता. तो रुग्णालयातून म्हणाला की, “आम्ही तर आशा सोडली होती.  तेव्हा आम्हाला थोडासा प्रकाश दिसला. लगेच आमच्यापैकी एकाला त्याच्या मोबाइलला नेटवर्क मिळाल्याचे दिसले. त्याने आमच्या महाव्यवस्थापकांना परिस्थितीची माहिती दिली,” प्रकल्पाच्या महाव्यवस्थापकांनी स्थानिक अधिकाऱ्यांना कळविले. आयटीबीपीची तुकडी, दोरखंड, पुलीज व कॅराबाइनर्स घेऊन आली आणि तिने रविवारी सायंकाळी बोगद्यातून लोकांना बाहेर काढले आणि ही मोहीम यशस्वी केली.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा