शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Glacier Burst: अद्यापही २०३ जण बेपत्ता; १८ जणांचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 07:33 IST

Uttarakhand Glacier Burst: जलप्रलयामुळे रैनी येथे ऋषिगंगा नदीवरील जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला आहे. त्याच्यापासून पाच किमी अंतरावर तपोवन धरणाचे काम सुरू आहे. त्याचेही मोठे नुकसान झाले.

डेहराडून : नंदादेवी या हिमालयीन शिखराजवळील हिमकडा कोसळून रविवारी आलेल्या जलप्रलयामुळे उत्तराखंडमध्ये धरण प्रकल्पावरील २०३ कर्मचारी बेपत्ता असून १८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिली आहे.जलप्रलयामुळे रैनी येथे ऋषिगंगा नदीवरील जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला आहे. त्याच्यापासून पाच किमी अंतरावर तपोवन धरणाचे काम सुरू आहे. त्याचेही मोठे नुकसान झाले. या प्रकल्पाच्या एका बोगद्यात ३४ कामगार अडकल्याची भीती आहे. त्यांची सुटका करण्यास एनडीआरएफ व आयटीबीपीच्या ३०० जवानांनी बचावकार्य हाती घेतले आहे. यासाठी इस्रो, डीआरडीओ या संस्थाही मदत करीत असल्याचे रावत म्हणाले.बोगद्यात साचलेला चिखल, दगडमातीचा ढिगारा उपसण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या प्रत्येक कामगाराला वाचविण्यात यश येईल, अशी आशा आयटीबीपीचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी व्यक्त केली. यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था) संयुक्त राष्ट्रांनी दर्शविली मदतीची तयारीउत्तराखंडमध्ये जलप्रलयामुळे बेपत्ता झालेल्यांना शोधण्यासाठी तसेच धरणाच्या बोगद्यामध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी मदत करण्याची तयारी  संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी दाखविली आहे.आता तरी जागे व्हा : ‘चिपको’चे आवाहनहिमालयातील जैवविविधतेची मोठ्या प्रमाणावर नासाडी सुरू आहे. त्यामुळेच उत्तराखंडमध्ये मोठी हानी झाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे आता तरी सर्वांनी जागे व्हावे, असे चिपको आंदोलनाचे नेते चंडीप्रसाद भट्ट यांनी म्हटले आहे.  उत्तराखंडच्या पाठीशी देश उभा : राहुल गांधीउत्तराखंडच्या पाठीशी सारा देश उभा आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांना शोधण्याच्या बचावकार्यात येत्या काही दिवसांत कोणतेही अडथळे येता कामा नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा