शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जगात भारी! जगातील सर्वात उंच कोथिंबिरीचं झाड; भारतीय शेतकऱ्याचं नाव गिनीज बुकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 15:57 IST

उत्तराखंडमधल्या प्रगतीशील शेतकऱ्याची कमाल; गिनीज बुकमध्ये नोंद

अल्मोडा: संपूर्ण देश कोरोना संकटाचा सामना करत असताना उत्तराखंडमधल्या एका प्रगतीशील शेतकऱ्यानं वेगळीच कमाल केली आहे. त्याबद्दल त्याच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. उत्तराखंडच्या अल्मोडामधल्या ताडीखेत विकासखंड इथे राहणाऱ्या गोपाल दत्त उप्रेती यांनी लावलेल्या कोथिंबिरीच्या झाडाची उंची २.१६ मीटरवर (७ फूट १ इंच) पोहोचली आहे. याआधी जर्मनीतल्या एका व्यक्तीनं लावलेल्या कोथिंबिरीच्या झाडाची वाढ १.८० मीटरपर्यंत (सहा फूट) झाली होती.  बिल्लेखमध्ये गोपाल दत्त उप्रेती यांचं जीएस ऑर्गेनिक फार्म आहे. याठिकाणी ०.२ हेक्टरवर ते कोथिंबीर आणि लसणाची शेती करतात. याशिवाय १.५ हेक्टरवर सफरचंदांची आणि भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. २१ एप्रिल रोजी मुख्य उद्यान अधिकारी त्रिलोकी नाथ पांडे आणि विवेकानंद पर्वतीय कृषी संशोधन विभागाचे डॉ. गणेश चौधरींनी गोपाल दत्त उप्रेती यांच्या बागेचं निरीक्षण केलं. शेतातल्या कोथिंबिरीची उंची सर्वसाधारण कोथिंबिरीच्या झाडाच्या उंचीपेक्षा जास्त असल्याचं यावेळी त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी सर्वाधिक उंचीचं कोथिंबिरीचं झाड पाच फूट सात इंचाचं होतं. तर कोथिंबिरीच्या इतर झाडांची उंची पाच फुटांच्या आसपास होती. २७ मे रोजी मुख्य उद्यान अधिकारी पांडे, जैविक उत्पादन परिषद मजखालीचे प्रभारी डॉ. देवेंद्र सिंह नेगी, उद्यान सचल दल केंद्र बिल्लेखचे प्रभारी राम सिंह नेगी यांनी उप्रेती यांच्या शेतातल्या कोथिंबिरीच्या झाडाची उंची मोजली. उप्रेती यांच्या शेतातलं सर्वात मोठं कोथिंबिरीचं झाड सात फूट एक इंचाचं आहे. याशिवाय त्यांच्या शेतातली कोथिंबिरीची इतर झाडं पाच ते सात फुटांची आहेत. पेशानं सिव्हिल इंजिनीयर असलेले गोपाल दत्त उप्रेती यांनी गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी अर्ज केला. त्यांनी कोथिंबिरीच्या उंचीसह इतर तपशील गिनीज बुकला पाठवले. कोथिंबिरीच्या झाडाची उंची जास्त असूनही त्याचा गंध किंवा इतर गोष्टींमध्ये फरक पडलेला नाही, असं उप्रेती यांनी सांगितलं.अमेरिकेत आंदोलकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबनाकोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणारलॉकडाऊनमध्ये काय चुकलं? राहुल गांधींशी चर्चेदरम्यान राजीव बजाज यांनी नेमकं कारण सांगितलंकेरळमध्ये आणखी एका हत्तीची हत्या?; फटाक्यांचाच वापर केल्याचा संशय