शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Election 2022: आजी-माजी मुख्यमंत्री लढत आहेत अस्तित्वाची लढाई; पुष्कर सिंह धामी, हरीश रावत यांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 07:03 IST

धामी तरुण असल्यामुळे एखाद्या पराभवाने त्यांची राजकीय कारकीर्द जरी संपुष्टात येणार नसली तरी, मुख्यमंत्रिपदावर विराजमान असताना पदरी पडलेला पराभव त्यांना शर्यतीत खूप मागे ढकलणारा ठरेल. 

रवी टालेहल्द्वानी : कुमाऊं विभागातील दोन प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत एकप्रकारे अस्तित्वाचीच लढाई लढत असून, मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना, दोघांसाठीही विजय सोपा नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री धामी आणि हरीश रावत यावेळी पराभूत झाल्यास दोघांचीही राजकीय कारकीर्दच धोक्यात येणार आहे. ही शेवटची निवडणूक असल्याचे सूतोवाच रावत यांनी स्वत:च केले असल्यामुळे या निवडणुकीतील पराभव त्यांच्या राजकीय वाटचालीवर पूर्णविराम लावणाराच ठरेल. 

धामी तरुण असल्यामुळे एखाद्या पराभवाने त्यांची राजकीय कारकीर्द जरी संपुष्टात येणार नसली तरी, मुख्यमंत्रिपदावर विराजमान असताना पदरी पडलेला पराभव त्यांना शर्यतीत खूप मागे ढकलणारा ठरेल. 

विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाविद्यमान मुख्यमंत्र्यांची ही स्थिती असताना, पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघत असलेले कॉंग्रेसचे बडे नेते हरीश रावत यांनाही विजयासाठी बरेच कष्ट उपसावे लागत आहेत. संपूर्ण राज्याची जबाबदारी असतानाही रावत सायंकाळी कोणत्याही परिस्थितीत नैनिताल जिल्ह्यातील लालकुंआ मतदारसंघात परत येतातच, ही एकच बाब त्यांचाही विजय सोपा नसल्याचे स्पष्ट करते. उत्तराखंडमध्ये हरदा या लाडक्या नावाने ओळखले जात असलेल्या रावत यांनी शेवटच्या राजकीय डावासाठी लालकुंआची निवड केल्याने जसे अनेकजण खूश आहेत, तसेच अनेकांना त्यांचे वारंवार मतदारसंघ बदलणे आणि एका महिला कार्यकर्त्याची उमेदवारी हिसकावून घेणे आवडलेले नाही.

ती महिला कार्यकर्ता आता अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्याने रावत यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप उमेदवारालाही बंडखोराचा सामना करावा लागत आहे, ही बाब मात्र रावत यांच्यासाठी काहीशी दिलासादायक आहे. 

टॅग्स :Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२