शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: आहे तुझी औकात..? नर्स भडकली, डॉक्टराच्या कानशिलात लगावली; रुग्णालयात खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 09:48 IST

डॉक्टर आणि नर्सची एकमेकांना शिवीगाळ अन् मारहाण; मोबाईलमध्ये कैद झाला प्रकार

मुरादाबाद: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या पाच दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील रुग्णालयांची क्षमता संपली असल्यानं आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णाचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. तर उत्तर प्रदेशातल्या रामपूरमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येच खडाजंगी झाली आहे. नर्स आणि डॉक्टर यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना से डर नहीं लगता साहब, पंखे से लगता है! रुग्णाचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरलरामपूर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्यात वाद झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. नर्सनं डॉक्टरांच्या कानशिलात लगावली. डॉक्टरांनीदेखील नर्सला मारहाण केली. यामुळे बराच गोंधळ झाला. पोलीस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोघांची समजूत काढून त्यांना शांत केलं. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला मृत्यूचं प्रमाणपत्र देण्यास सांगितलं. त्यासाठी नर्स डॉक्टरांकडे गेली. तर डॉक्टरांनी तिला ही बाब लिखित स्वरुपात आणायला सांगितली. नातेवाईक नर्सकडे गेल्यावर ती संतापली. तिनं आपत्कालीन विभागात धाव घेतली. यानंतर तिचा डॉक्टरांसोबत वाद झाला. दोघांनी एकमेकांनी शिवीगाळ केली. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं.तुझी औकात आहे का, असं म्हणत नर्सनं डॉक्टरांच्या श्रीमुखात भडकावली. यानंतर डॉक्टरांनीदेखील हात उचलला. त्यामुळे आपत्कालीन विभागात गोंधळ झाला. तिथे कर्मचारी मोठ्या संख्येनं कर्मचारी उपस्थित होते. मृत रुग्णाचे नातेवाईकदेखील तिथेच होते. यापैकी कोणीतरी संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर तो व्हायरल झाला. मारहाणीची माहिती रुग्णालयातील पोलीस चौकीला मिळाली. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण शांत केलं. या प्रकरणी कोणीही पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या