शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य, जबरदस्त काम करतायत मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींकडून योगींचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 12:49 IST

मोदी म्हणाले, 2017 पूर्वीही दिल्लीतून उत्तर प्रदेशसाठी पैसा पाठविला जात होता. मात्र, तेव्हा लखनौत त्याला अडथळा यायचा. आज योगीजी प्रचंड परिश्रम करत आहेत.

वारानसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी वाराणसी (Narendra Modi in Varanasi) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या योजनांची सुरुवात केली. येथील स्थानिक जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचेही (Yogi Adityanath) तोंडभरून कौतुक केले. मोदी म्हणाले आज उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे. मुख्यमंत्री योगी प्रचंड मेहनत करत आहेत. 

'विकास कामांवर असते योगींची नजर' -मोदी म्हणाले, 2017 पूर्वीही दिल्लीतून उत्तर प्रदेशसाठी पैसा पाठविला जात होता. मात्र, तेव्हा लखनौत त्याला अडथळा यायचा. आज योगीजी प्रचंड परिश्रम करत आहेत. स्वतः योगी येथे येऊन विकास कामांवर लक्ष ठेवतात. ते प्रत्येक जिल्ह्यात जातात आणि वेग-वेगळ्या कामांवर लक्ष ठेवतात. यामुळेच उत्तर प्रदेशात परिवर्तन होताना दिसत आहे.

'आता उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य' -पंतप्रधान मोदी म्हणाले, माफिया राज आणि बोकाळत सुटलेल्या दहशतवाद, यांना आता कायद्याचा चाप बसला आहे. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. आज गुन्हेगारांना समजले आहे, की ते कायद्यातून वाचू शकणार नाहीत. उत्तर प्रदेश सरकार आज भ्रष्टाचार आणि घराणेशाहीपासून मुक्त आहे. यूपी सरकार विकासवादावर चालत आहे. आता येथे जनतेच्या योजनांचा फायदा थेट जनतेला मिळत आहे. 

कोरोना व्यवस्थापनाचं  केलं कौतुक -कोरोनासंदर्भात बोलताना मोदींनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. पीएम मोदी म्हणाले, उत्तर प्रदेशची लोकसंख्या अनेक देशांपेक्षा अधिक आहे. तरीही येथील सरकार आणि लोकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला.उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्यातील अनेक नेत्यांनी भाष्य केले होते, की उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा चेहरा कोण असेल, हे केंद्रीय नेत्व ठरवेल. यातच आज पंतप्रधान मोदींनी स्वतःच सीएम योगींचे उघडपणे कौतुक केले आहे. यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी