शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! बूट लपवणं पडलं महागात; नवरीनं चक्क लग्नच मोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 16:11 IST

लग्न म्हणजे दोन मनाचं मीलन असतं.

मुझफ्फरनगर: लग्न म्हणजे दोन मनाचं मीलन असतं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं लग्नाच्या परंपरा आणि रीतिरिवाज पार पाडत असतो. हिंदूंमध्ये लग्न सोहळ्यात नवरदेवाचे बूट लपवण्याची एक पद्धत असते. मुजफ्फरनगरमध्ये हीच पद्धत एक लग्न मोडण्यास कारण ठरली आहे. मेहुणीनं बूट लपवल्यामुळे नवरदेवाला प्रचंड राग आला आणि त्यानं नवरी मुलीकडच्यांना भर मंडपातच खडे बोल सुनावले. एवढ्यावरच न थांबता ते लग्न मोडल्यामुळे नवरी मुलीला सिसोलीतून दिल्लीत माघारी परतावं लागलं.त्याचं झालं असं की, लग्नसोहळ्यात वधूपक्षाकडील काही तरुणींनी आणि महिलांनी नवरदेवाचे बूट लपवले. ते परत करण्यासाठी नवरदेवाकडे पैशांची मागणी केली. नवऱ्या मुलानं पैसे न देता वधूकडच्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर खूप मोठा वाद झाला. वधूकडच्या मंडळींनी नवरदेवाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु नवरदेवानं अपशब्द वापरत त्यांचा अपमान केला, तसेच वधूकडच्या एका व्यक्तीच्या श्रीमुखात भडकावली. हा सगळा प्रकार नवरी मुलीला समजल्यानंतर तीसुद्धा भडकली. तिनंही घरच्या मंडळींना हे लग्न मोडण्याचा सल्ला दिला. तसेच हुंडा म्हणून दिलेले दहा लाख रुपये परत करण्याचे मान्य केल्यानंतरच नवरदेवासह वरातीसह जाण्यास दिले. भोराकला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, लग्नसोहळ्यातील वादाबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकारी वीरेंद्र कसाना यांनी सांगितले, नवरा मुलगा किंवा नवरी मुलगीकडून कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. पोलीस ठाण्याबाहेरच दोन्हीकडील मंडळींनी वाद मिटवला. या नवरी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता ती लग्नास तयार नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं

टॅग्स :marriageलग्न