शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Politics: अखिलेशवर मायावतींचा पलटवार; "जे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ते दुसऱ्यांना पंतप्रधान कसे करणार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 11:25 IST

Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर आता सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा सुप्रीमो मायावती देशाच्या राष्ट्रपतीपदावरुन आमनेसामने आले आहेत.

Mayawati vs Akhikesh Yadav: सध्या उत्तर प्रदेशात बसपा सुप्रीमो मायावती (Mayawati) आणि सपा सुप्रीमो अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळतं आहे. ''मायावती देशाच्या पंतप्रधान व्हाव्यात'', असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावर आता मायावती यांची तिखट प्रतिक्रिया आली आहे. ''जे स्वतः एका राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ते दुसऱ्यांना पंतप्रधान कसे करणार," अशी टीका मायावती यांनी केली आहे.

'यूपीत सपाचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही'मायावती म्हणाल्या की, "यूपीमध्ये मुस्लिम आणि यादव समाजाची पूर्ण मते घेऊन, तसेच अनेक पक्षांशी युती करुनही सपा प्रमुखांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही, तर ते इतरांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार आहेत? लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बसपासोबत युती करून केवळ 5 जागा जिंकू शकले, मग ते बसपा प्रमुखांना पंतप्रधान कसे करू शकतील? त्यामुळे त्यांनी अशी बालिश विधाने करणे बंद करावीत. यूपीमध्ये मुख्यमंत्री होण्याचे सपाचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही," अशी घणाघाती टीका मायावती यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी सुरू झाला वाद मायावती आणि अखिलेश यांच्यातील हा वाद दोन दिवसांपूर्वी सुरू झाला होता. अखिलेश यादव एका कार्यक्रमात म्हणाले होते की, "भाजपने बसपची मते जिंकली आहेत, भाजप आता मायावतींना राष्ट्रपती करणार का?" अखिलेशच्या या वक्तव्यावर मायावतींनी पलटवार करत म्हटले होते की, "त्या यूपीच्या मुख्यमंत्री किंवा देशाच्या पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतात, पण राष्ट्रपती होण्याचे नाही. यूपीमध्ये भाजपच्या विजयाला सपा जबाबदार आहे. यूपीच्या सीएम पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी सपा मला राष्ट्रपती बनवण्याचे स्वप्न पाहत आहे," असे मायावती म्हणाल्या. 

टॅग्स :mayawatiमायावतीAkhilesh Yadavअखिलेश यादवBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टी