शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियात काम करणाऱ्या भारतीय व्यक्तीने एसएमएस करून पत्नीला दिला तिहेरी तलाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 20:22 IST

तिहेरी तलाकविरोधातील माहिती देशाच्या बाहेर काम करणाऱ्या भारतीय नागरिकांपर्यंत पोहचली नाही.

सुल्तानपूर- लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयक संमत झालं आहे, राज्यसभेट ते रखडलं आहे आणि लकरच त्यावर कायदा होणार अशी आशा आहे. पण तिहेरी तलाकविरोधातील माहिती देशाच्या बाहेर काम करणाऱ्या भारतीय नागरिकांपर्यंत पोहचली नसल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला फोनवर एसएमएसकरून  तिहेरी तलाक दिला. 'एएनआय'च्या वृत्तानुसार तिहेरी तलाक देणारी व्यक्ती उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरच्या नंदौलीची रहाणारी आहे. 'सासरची मंडळी हुंड्यामध्ये एक कारची मागणी करून त्रास देत आहेत. नवरासुद्धा योग्य वागणूक देत नव्हता. मला पतीने एसएमएसकरून तिहेरी तलाक दिला. माझा एक मुलगा असून त्याच्याबरोबर मला अख्खं आयुष्य काढायचं आहे. सासर हेच माझं घर असून मी इथून कुठेही जाणार नाही', असं पीडित महिलेने म्हंटंल.

 

पीडित महिलेच्या वडिलांनी सांगितलं की, मुलीच्या लग्नानंतर दोन वर्ष सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण नंतर सासरचे तिला त्रास द्यायला लागले. त्यांनी तिला नंतर घराबाहेर काढलं. त्यानंतर एके दिवशी तिच्या पतीने तिला एसएमएसकरून तिहेरी तलाक दिला. सोशल मीडियावर युजर्स या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत असून अप्रत्यपणे काँग्रेसवर टीका केली जाते आहे. 'अशा लोकांच्या(तिहेरी तलाक देणाऱ्यांच्या) मदतीला काँग्रेस उभी आहे, असं एका युजरने म्हंटलं आहे. 'राहुल गांधी लवकरच संपूर्ण देशाला अमेठी करतील', असं एका युजरने म्हंटलं आहे. 

लोकसभेमध्ये तिहेरी तलाकसंबंधी विधेयक संमत झाल्यानंतर तिहेरी तलाकचं विधेयक राज्यसभेत हिवाळी अधिवेशनात संमत होऊ शकलं नाही. राज्यसभेत विरोधकांनी या विधेयकाला सेलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी लावून धरली. आता सरकार 29 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बजेट सत्रात विधेयक पुन्हा संमत करून घेण्याचे प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक