शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'या' गावच्या मतदार यादीत ओबामा, मोदी अन् सोनम कपूरसह अनेक दिग्गज; प्रशासनाचे धाबे दणाणले

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 14, 2020 20:33 IST

हा प्रकार समोर आल्यानंतर, येथील प्रशासन चक्रावले आहे. नव्हे येथील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. (Uttar pradesh)

ठळक मुद्देया मतदार यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोठ्या-मोठ्या दिग्गजांची नावे आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.ही मतदार यादी 2015मध्येच तयार करण्यात आली आहे. तीच यादी 2020मध्येही पुनरावलोकनासाठी बीएलओंना सादर करण्यात आली आहे.

सिद्धार्थनगर -उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात भैसहिया नावाचे गाव आहे. या गावच्या मतदार यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोठ्या-मोठ्या दिग्गजांची नावे आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर, येथील प्रशासन चक्रावले आहे. नव्हे येथील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

धक्कादायक गोष्ट म्हणजे, राजकीय नेते आणि चित्रपट अभिनेत्रींची नावे बीएलओसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या यादीत आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मतदार यादी 2015मध्येच तयार करण्यात आली आहे. तीच यादी 2020मध्येही पुनरावलोकनासाठी बीएलओंना सादर करण्यात आली आहे. पुनरावलोकनाचे काम सुरू आहे. यातील तृटीही दूर केल्या जात आहेत. नवी यादी 6 डिसेंबरला जारी केली जाईल.

मुलायम, माया आणि सोनम कपूरचेही नाव - डुमरियागंज तहसीलच्या हद्दीत येणाऱ्या भैसहिया गावच्या मतदार यादीत मोठा घोटाळा झल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव, मायावती, एमपीचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर आदींच्या नावाचाही समावेश आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयावर प्रश्नचिन्ह -मतदार यादीत झालेला हा घोटाळा लक्षात आल्यानंतर जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या गावात साधारणपणे 1300 मतदार आहेत. असेही अनेक लोक आहेत, ज्यांनी मतदार यादीत नाव यावे यासाठी अनेक वेळा कागदपत्र जमा केली आहेत. मात्र, अद्यापही त्यांची नावे मतदार यादीत आलेली नाहीत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीSonam Kapoorसोनम कपूरMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान