शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

हाथरस प्रकरण : बाबरी प्रकरणाच्या निकालामुळे रात्री केला अंत्यसंस्कार, सर्वोच्च न्यायालयात यूपी सरकारचे शपथपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 14:09 IST

योध्या-बाबरी प्रकरणामुळे जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच कोरोनामुळे गर्दी न होऊ देण्याचा उल्लेखही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात केला आहे. (Uttar Pradesh government, Hathras gangrape)

ठळक मुद्देकुटुंबीयांच्या परवानगीनंतर आणि हिंसेपासून बचावासाठी आर्ध्या रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार - UP सरकारयासंदर्भात पोलिसांना 14 सप्टेंबरला माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ पावले उचलली. हाथरसमध्ये मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी - UP सरकार

नवी दिल्ली - हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यात उत्तर प्रदेश सरकारने विरोधकांवर जातीय दंगे पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात, कुटुंबीयांच्या परवानगीनंतर आणि हिंसेपासून बचावासाठी आर्ध्या रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही म्हटले आहे. 

अयोध्या-बाबरी प्रकरणामुळे जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच कोरोनामुळे गर्दी न होऊ देण्याचा उल्लेखही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात केला आहे. यूपी सरकारने म्हटले आहे, की अयोध्या-बाबरी प्रकरणात आलेल्या निकालाची संवेदनशीलता लक्षात घेत पीडितेच्या कुटुंबीयांच्या परवानगीने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दंगली घडविण्याचे नियोजित प्रयत्न - यासंदर्भात पोलिसांना 14 सप्टेंबरला माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ पावले उचलली. एवढेच नाही, तर या प्रकरणाचा वापर करून जातीय आणि सांप्रदायिक दंगली घडविण्यासाठी राजकीय पक्षांचे काही वर्ग, सोशल मीडिया, काही वर्गांच्या प्रिंट आणि इलेक्ट्रानिक मिडियाने नियोजित प्रयत्न केला, असेही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात म्हटले आहे.

हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी - हाथरसमध्ये मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यूपी सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. एवढेच नाही, तर आपणही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकतो. मात्र, निष्पक्ष तपास होऊ नये, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत, असेही यूपी सरकारने म्हटले आहे.

सकाळच्या सुमारास हिंसाचार होण्याचे इनपूट होते - यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात, अर्ध्यारात्री अंत्यसंस्कार का करावा लागला? याचे कारणही सांगितले आहे. यानुसार, संबंधित मुलीच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्याची तयारी सुरू आहे, असे इनपूटही गुप्तचर संस्थांकडे होते. जर, सकाळपर्यंत वाट पाहिली असती, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. यामुळे संबंधित मुलीच्या कुटुंबीयांच्या परवानगीनेच रात्री मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथGang Rapeसामूहिक बलात्कारRapeबलात्कार