शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Uttar Pradesh Election 2022: बटाट्याची दारू रंगतेय..गुंडांची नशा उतरतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 07:57 IST

फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते.

सचिन जवळकोटेफिरोझाबाद : उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. आता सर्व नेत्यांचं लक्ष तिसऱ्या टप्प्याकडे वळालंय. मात्र या ठिकाणी बटाट्याची दारू भलतीच धुमाकूळ घालू लागलीय तर गल्लीबोळातल्या गुंडांची नशा झटक्यात उतरलीय. 

यमुना नदीचं खोरं सध्या ‘बटाट्याचा टापू’ म्हणून प्रसिद्ध. फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते. जवळपास साडेपाच लाखांहून अधिक शेतकरी आपल्या शेतात बटाटाच पिकवितात. फरुखाबादसारख्या केवळ एका गावातून बारापेक्षाही जास्त किसान रेल्वे बटाटा घेऊन गेल्या वर्षभरात धावल्या आहेत. शेतकरी आता एकजूट करून प्रश्न विचारू लागलेत. सुरेश सिंग चंदेल ‘लोकमत’ला सांगत होते, ‘जोपर्यंत देशात बटाट्याच्या को-प्रॉडक्ट फॅक्टरी सुरू होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला हमीभाव मिळणारच नाही. त्यासाठी सरकारनं बटाट्यातून अल्कोहोल तयार करण्याच्या उद्योगांना परवानगी द्यावी. सध्या या परिसरात बटाट्यावर अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेतीत उतरलेल्या आनंद शर्मा यांचा तर दावा आहे की, राष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्रानं विकसित केलेला निळा बटाटा शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करेल. 

कारण मधुमेह आणि कर्करोग यांच्यासाठी अत्यंत प्रभावशाली असलेला हा नवा बटाटा कमी खर्चात जास्त उतारा देतो.’ उत्तर प्रदेशात बटाट्याचा व्होडका तयार होईल का नाही, याची गॅरंटी या क्षणी कोणत्याच राजकीय नेता देऊ शकत नाही. मात्र याच नेत्यांच्या जीवावर गावागावांत धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांची नशा उत्तर प्रदेश पोलिसांनी पूर्णपणे उतरून टाकलीय. यंदाच्या प्रचार धुमाळीत निवडणूक आयोगानं अत्यंत कडक भूमिका घेतल्याचं सर्वांनाच जाणवू लागलंय. गल्लीबोळातले एकेक गुंड वेचून-वेचून पोलिसांनी गजाआड केलेत.

थंडीचा कडाका, दारूचा शिडकावा!

उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापत असलं असलं तरी थंडीचा कडाका मात्र वाढत चाललाय. या थंडीपासून शेतातील बटाट्याचं सरंक्षण करण्यासाठी शेतकरी चक्क देशी दारूचा वापर करताहेत. पाण्यात दारूच्या बाटल्या ओतून त्याची फवारणी पिकावर केली जात आहे. यामुळे पिकांना म्हणे गर्मी मिळते. विशेष म्हणजे आचारसंहिता काळात अडचण नको म्हणून अनेकांनी अगोदरच बाटल्यांची खोकी घरात भरून ठेवलीत.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२