Uttar Pradesh Election 2022: यूपीच्या निवडणुकीत ‘बदलापूर’ची चर्चा; मुंबईत रोजगार देण्याचं उमेदवारांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 04:12 PM2022-03-07T16:12:20+5:302022-03-07T16:12:45+5:30

यंदाच्या बदलापूर निवडणुकीत नवा ट्रेंड पाहायला मिळाला. याठिकाणी मतदारांसोबतच उमेदवारही जे वर्षोनुवर्षे मुंबईत कामानिमित्त राहत आहेत तेच उभे राहिलेत

Uttar Pradesh Election 2022: Out Of 14 Candidates From Badlapur, 6 Are From Mumbai, More Campaigning Was Done In Mumbai | Uttar Pradesh Election 2022: यूपीच्या निवडणुकीत ‘बदलापूर’ची चर्चा; मुंबईत रोजगार देण्याचं उमेदवारांचं आश्वासन

Uttar Pradesh Election 2022: यूपीच्या निवडणुकीत ‘बदलापूर’ची चर्चा; मुंबईत रोजगार देण्याचं उमेदवारांचं आश्वासन

Next

उत्तर प्रदेशातील बदलापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी खूप चर्चेत होती. यावेळी उमेदवारासह मतदारही मुंबईचे होते. उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी तर मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येने ट्रेनमधून इथं पोहचले होते. ७ मार्चला मतदान झाल्यानंतर आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या निवडणुकीचा प्रचार जितका बदलापूर मतदारसंघात झाला तितकाच मुंबईच्या जवळ असलेल्या बदलापूरमध्येही झाला. त्याठिकाणी रॅली, सभा, डोअर टू डोअर कॅम्पेन राबवण्यात आलं.

यंदाच्या बदलापूर निवडणुकीत नवा ट्रेंड पाहायला मिळाला. याठिकाणी मतदारांसोबतच उमेदवारही जे वर्षोनुवर्षे मुंबईत कामानिमित्त राहत आहेत तेच उभे राहिलेत. या जागेवर ज्या १४ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. त्यातील निम्म्याहून अधिक उमेदवार मुंबईचे आहेत. १२ जणांचे उमेदवार अर्ज मुंबईचं मतदार कार्ड असल्याने रद्द करण्यात आले. बदलापूर मतदारसंघातील जे लोकं मुंबईत राहतात त्यांचे आधार कार्ड भलेही मुंबईचं असलं तरी मतदारकार्ड गावाकडचं असतं. हे लोकं केवळ मतदान कार्ड ठेवत नाहीत तर प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्यासाठी गावाकडे पोहचता. यावेळी काहीजण मतदानासोबतच येथे निवडणुकीत उभं राहण्यासाठी आले होते.

२००८ च्या मतदारसंघ पुर्नरचनेत बदलापूर मतदारसंघ अस्तित्वात आला. २०१२ मध्ये याठिकाणी पहिल्यांदा मतदान झालं. तेव्हा समाजवादी पक्षाचे ओमप्रकाश दुबे आमदार झाले. दुबे यांना जितकं मतदान झालं त्यात मतदारसंघात राहणाऱ्यांपेक्षा मुंबईत राहणाऱ्या मतदारांचे पडले. याठिकाणी बहुजन समाजवादी पक्षाचे लालजी यादव दुसऱ्या स्थानावर निवडून आले. २०१७ च्या निवडणुकीत याठिकाणाहून भाजपाने विजय मिळवला. भाजपाचे रमेश चंद्र यांनी लालजी यादव यांना २ हजार ३७२ मतांनी हरवलं. तर विद्यमान आमदार ओमप्रकाश दुबे तिसऱ्या नंबरवर गेले.

सिनेमामुळेही बदलापूर मतदारसंघ चर्चेत

बदलापूर सर्वात आधी अभिनेता वरूण धवनचा बदलापूर नावाच्या सिनेमानं चर्चेत आलं. सिनेमात केवळ नाव बदलापूर सेम होतं बाकी कुठलीही भूमिका अथवा कथा या मतदारसंघाशी निगडीत नाही. मैने गांधी को क्यो मारा हा सिनेमा बनवणारे मानसिंह हे बदलापूरचे रहिवासी आहेत. मुंबईत राहणारे जे उमेदवार आहेत. त्यांनी मुंबईत तुम्हाला रोजगार देऊ असं आश्वासन निवडणुकीत दिलं आहे.

Web Title: Uttar Pradesh Election 2022: Out Of 14 Candidates From Badlapur, 6 Are From Mumbai, More Campaigning Was Done In Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.