शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अॅपलच्या मॅनेजरला पोलिसांनी घातल्या गोळ्या, कार न थांबवल्यानं आला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 17:57 IST

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल रात्री उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या गोमती नगर या उच्चभ्रू परिसरात उत्तर प्रदेशच्या पोलीस कॉन्स्टेबलनं अॅपलच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल रात्री उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या गोमती नगर या उच्चभ्रू परिसरात उत्तर प्रदेशच्या पोलीस कॉन्स्टेबलनं अॅपलच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलीस कॉन्स्टेबलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले विवेक तिवारी हे अॅपल कंपनीमध्ये मॅनेजर आहेत.विशेष म्हणजे सहका-याला सोडण्यास गेले असताना विवेकची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. काल रात्री उशिरा विवेक स्वतःच्या सहका-याला बरोबर घेऊन कामावरून घरी परतत होता. त्याच दरम्यान गोमतीनगर परिसरात दोन पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु विवेकनं गाडी थांबवली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला, त्या गोळीबारात एक गोळी विवेकच्या डोक्यातून आरपार गेली आणि विवेकचा मृत्यू झाला.या प्रकरणात कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी याला अटक केली आहे. घटनास्थळी गाडीमध्ये उपस्थित असलेल्या सना खाननं सांगितलं की, मी माझ्या सहका-याबरोबर घरी जात होती. त्याचं नाव विवेक तिवारी आहे. गोमती नगरजवळ आमची गाडी उभी होती. त्याच वेळी दोन पोलीस समोरून आले म्हणून आम्ही त्यांची नजर चुकवून तिकडून निघण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक गोळीबार करण्यात आला. आम्ही गाडी वेगानं दामटण्याचा प्रयत्न केला. पुढे आमची गाडी एका दिवाळाला धडकली आणि विवेकच्या डोक्यातून रक्तस्रावास सुरुवात झाली. मी सगळ्यांकडे मदतीची याचना केली. त्यावेळी पोलीस आले आणि त्यांनी विवेकला रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत विवेकचा मृत्यू झाला होता.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आल्यावर होणार अंत्यसंस्कार- पत्नीविवेकची पत्नी कल्पना तिवारीच्या मते, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत नाहीत तोपर्यंत पतीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत. तसेच त्यांनी पोलीस आणि उत्तर प्रदेश सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत. जर माझा पती तुम्हाला संशयित वाटत होता, त्यांनी गाडी थांबवली नाही, तर तुम्ही आरटीओमध्ये गाडीचा नंबर देऊन कारवाई करू शकत होतात. पोलिसांनी त्यांना गोळ्या का घातल्या?, त्यावेळी माझ्या पतीबरोबर असलेल्या महिलेला मी ओळखते. मला रुग्णालयातील एका कर्मचा-यानं तुमचा पती आणि त्याची सहकारी जखमी असल्याचं सांगितलं. परंतु पोलिसांनी मला याची काहीही कल्पना दिली नाही.या प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागणी विवेकच्या नातेवाईकांनी केली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, विवेक तिवारीचा मृत्यू गोळी लागून झाला आहे. विवेकनं माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्याच्यावर गोळी झाडली, असं त्या पोलीस कॉन्स्टेबलनं सांगितलं आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश