शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

Yogi Adityanath : 'बबुआ ट्विटर ही वोट देगा'; अखिलेश यादव यांच्या ट्वीट्सवरून योगी आदित्यनाथांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 22:24 IST

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इटावामध्ये विरोधकांवर साधला जोरदार निशाणा.

इटावा येथे पोहोचलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. "कोरोना कालावधीत दमी तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन वेळा आलो. व्यवस्था पाहण्यासाठी दोन्गी आमदार, खासदार यांच्यासोबत जिल्हा प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि कोरोना वॉरिअर्ससह मिळून लोकांची मदत केली. त्यादरम्यान, दुसऱ्या पक्षाचे लोक होम आयसोलेशनमध्ये होते," असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. सपाचा गढ मानल्या जाणाऱ्या इटावामध्ये योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

"जे लोक संकटादरम्यान आपल्या घरात बसून राहिले, त्यांना निवडणुकीदरम्यानही घरातच बसण्याची आवश्यकता आहे. त्यांना घरातचं बसवलं पाहिजे. जो संकट कालावधीत तुमच्या सोबत उभा राहू शकला नाही, तुमच्या दु:खात सहभागी होऊ शकत नाही, वेळ आल्यावर त्याला उत्तर देण्याची गरज आहे," असं योगी आदित्यनाथ म्हणाले. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांचाही समाचार घेतला. जे लोक ट्विटरवरच मर्यादित होते, त्यांना ट्विटरच मत देईल हे सांगा, असं म्हणत त्यांनी टोला लगावला. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी माफिया आणि गुन्ह्यांबाबतही इशारा दिला. "आता माफियांवर बुलडोदर चालत आहे, पुढे त्यांना समर्थन देणाऱ्यांचाही नंबर येणार आहे," असं त्यांनी नमूद केलं. ज्यांना तुरूंगात टाकलं जात आहे, त्यांच्याशी हात मिळवून सरकार आलं तर काय होईल? अशा लोकांचं मनसुबे समजणं आवश्यक आहे, असं ते कोणाचंही नाव न घेता म्हणाले. पूर्वीचं सरकार बेईमानी, भ्रष्टाचार करत होतं. पूर्वी पैसा कब्रस्तानच्या बाऊंड्रीवॉल तयार करण्यात जात होता, आता तो गरीबांच्या कामी येत आहे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

मुलायम सिंग कुटुंबीयांवर निशाणा"यापूर्वी सरकारमध्ये एकाच कुटुंबाबात विचार केला जात होता. परंतु आमचं सरकार २५ कोटी जनतेचा विचार करून काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० कोटी जनतेला मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस देऊन इतिहास रचला आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. "इटावाच्या भूमीवर जन्मलेल्या काही लोकांनी लस घेण्यास विरोध केला होता. यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात लस घेऊन निवडणुकीत काय करणार आहात हे सिद्ध केलं," असंही योगी आदित्यनाथ यांनी नमूद केलं.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादव