शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

योगींच्या शपथविधीची तारीख ठरली! २५ मार्चला स्टेडियमवर भव्य सोहळा, कोण-कोण उपस्थित राहणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 22:56 IST

पाच वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर यूपीमध्ये पुन्हा एकदा योगी सरकार विराजमान होण्यासाठी सज्ज झालं आहे.

लखनौ-

पाच वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर यूपीमध्ये पुन्हा एकदा योगी सरकार विराजमान होण्यासाठी सज्ज झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा दुसरा शपथविधी सोहळा होणार येत्या २५ मार्च रोजी होणार आहे. २५ मार्च रोजी शहीद पथ येथील एकना स्टेडियमवर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मंत्रीही शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळात महिला आणि तरुणांवर विशेष लक्ष असेल. दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक केंद्र सरकारचे मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. एकना स्टेडियमवर प्रस्तावित शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या स्वरूपाबाबत योगींच्या पक्षनेतृत्वाशी चर्चा झाली आहे. यूपीमध्ये सरकार स्थापनेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना अनुक्रमे निरीक्षक आणि सहनिरीक्षक बनवण्यात आले आहे. मुख्यमंत्री गोरखपूरहून लखनौला पोहोचल्यावर शपथ घेणार्‍या मंत्र्यांची यादी निश्चित केली जाईल. 

योगी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी बसपा सुप्रीमो मायावती, सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांमध्ये महिलांचाही भरीव सहभाग असेल.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा