शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election 2022 : रावणाची सासुरवाडी मेरठमध्ये रामाच्याच नावाची चर्चा, भाजपचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 08:08 IST

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी रोजी होणार मतदान

गजानन चोपडे मेरठ : रावणाची पत्नी मंदोदरीचे माहेर अर्थात बाहुबली रावणाची सासुरवाडी मेरठ. मंदोदरीने याच शहरातील बिल्वेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथांकडे पृथ्वीवरील सर्वाधिक बुद्धिमान आणि शक्तिशाली पतीची मनोकामना केली होती. मंदोदरीसोबत विवाह बंधनात अडकल्यानंतर रावणाला या शहराने अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता रावणाच्या सासुरवाडीत रामाचीच चर्चा आहे.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील मेरठ जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ वगळता इतर सहा जागांवर भाजपचाच कब्जा आहे. तो यंदाही कायम राहणार, असा दावा भाजप गोटातून केला जात आहे. मेरठ शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे.  बिल्वेश्वर मंदिरातच रावणाची मंदोदरीसोबत पहिल्यांदा भेट झाली होती. यानंतर दोघेही विवाह बंधनात अडकले. या शहराचे प्राचीन नाव मयदानव असे होते. मंदोदरीने सतत चाळीस दिवस या मंदिरात दीप प्रज्वलित करून भगवान शिवाला प्रसन्न केले होते. असे असले तरी मागील अनेक वर्षांपासून या शहराला रामाने अर्थात भाजपने भुरळ घातली आहे. मेरठ शहर मतदारसंघ वगळता इतर सहा मतदारसंघांमध्ये भाजपचाच कब्जा आहे.  मेरठ कँट, मेरठ दक्षिण, सिवालखास, सरधना, हस्तीनापूर, किठौरमध्ये भाजपचे आमदार असून, मेरठ शहर हा मतदारसंघ समाजवादी पक्षाकडे आहे. यंदाही तीच स्थिती सामान्य माणसाशी बोलताना दिसून आली. सपा पत्रपरिषदेवर मर्यादित, तर भाजप हायटेक, बसपा नावापुरतीच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडीचे जयंत चौधरी यांनी केलेला मेरठचा दौरा पत्रपरिषदेपुरताच मर्यादित राहिला. 

लोक काय म्हणतातn    खैरनगर मार्केट परिसरात निखिल शर्मा या तरुणाची भेट झाली. तो म्हणाला, आम्ही तसे काँग्रेसी. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भाजपने आपली पकड मजबूत केली आहे.n    रामराज्याची घोषणा करणारा हा पक्ष यंदाही रामाच्या नावावर मतांचा जोगवा मागत आहे. शहरातील हापूड रोड मार्केट आणि सदर भागातील नागरिकांचीही हीच प्रतिक्रिया आहे.

मायावतींची सावध भूमिकाबहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी गाझियाबाद येथे प्रचार रॅलीला संबोधित करताना सावध भूमिका घेतली. समाजवादी पक्षावर आगपाखड करताना त्यांनी भाजपवर मात्र सौम्य टीका केली. त्यांचे एकंदर भाषण अखिलेश यादव यांनाच टार्गेट करणारे होते. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Ram Mandirराम मंदिरElectionनिवडणूक