शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आता 'या' राज्यात लोकांनी मास्क वापरला नाही, तर पोलिसांवर होणार कारवाई; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 13:32 IST

न्यायालयाने म्हटले आहे, की सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांत 50हून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. सरकारने ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेन्टचा वेग वाढवावा. तसेच, शहरांत खुली मैदाने घेऊन तेथे अस्थायी रुग्णालये तयार करून कोरोना पीडितांवर उपचाराची व्यवस्था करावी. 

प्रयागराज - उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाढत्या  कोरोना संक्रमणावर चिंता व्यक्त करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad high court) सरकारला  संक्रमणामुळे अधिक प्रभावित झालेल्या शहरांत पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा सल्ला दिली आहे. सरकारने दोन अथवा तीन आठवड्यांच्या पूर्ण लॉकडाउनवर विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर रस्त्यावर कुणीही व्यक्ती विना मास्क आढळल्यास पोलिसांवर अवमानना कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. (Uttar Pradesh Allahabad high court says without showing mask contempt action will be taken against police)

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

न्यायालयाने म्हटले आहे, की सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांत 50हून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. सरकारने ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेन्टचा वेग वाढवावा. तसेच, शहरांत खुली मैदाने घेऊन तेथे अस्थायी रुग्णालये तयार करून कोरोना पीडितांवर उपचाराची व्यवस्था करावी. 

कोरोनासंदर्भातील एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा तसेच न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले आहे, की नाइट कर्फ्यू अथवा कोरोना कर्फ्यू संक्रमणाचा प्रसार होऊ नये, यासाठी उचललेली छोटी पावले आहेत. याचा उपयोग केवळ नाइट पार्टी तसेच नवरात्र अथवा रमजानमधील धार्मिक गर्दी थांबवण्यासाठीच मर्यादित आहे.

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी? न्यायालयाने म्हटले आहे, की लॉकडाउन लावणे योग्य नाही. मात्र, संक्रमण ज्या पद्धतीने पसरत आहे, ते पाहता, सरकारने अधिक संक्रमण असलेल्या शहरांत लॉकडाउन लावण्यावर विचार करायला हवा. कोरोनाचे अधिक संक्रमण असलेल्या शहरांत लखनौ, कानपूर, प्रयागराज, वाराणसी आणि गोरखपूर शहरांचा समावेश आहे.

विकास लोकांसाठी, लोकच नसतील तर विकासाचा काय उपयोग -न्यायालयाने म्हटले आहे, जेव्हा महापूर येतात, तेव्हा नदीवरील बांधही ते रोखू शकत नाहीत. त्यामुळे आपल्यालाही कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. दिवसाच्या अनावश्यक वाहतुकीवरही नियंत्रण आणायला हवे. जीवन राहिले तरच त्याचा उपभोगही घेता येईल आणि अर्थव्यवस्थाही सुरळीत होईल. विकास लोकांसाठी आहे. जर लोकच राहिले नाही, तर विकासाला काय अर्थ उरेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आता डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून मोठा खुलासा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस