शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उत्कल एक्स्प्रेस अपघात अभियांत्रिकी चुकीमुळे?, उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 22:18 IST

नवी दिल्ली, दि. 20 - शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशात मुज्जफरनगरजवळ खतौली येथे पुरी-हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसला झालेला अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या ...

नवी दिल्ली, दि. 20 - शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशात मुज्जफरनगरजवळ खतौली येथे पुरी-हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसला झालेला अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, तर एका अधिका-याची बदली करण्यात आली आहे. एरव्ही काहीही झाले तरी शांत असणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या अपघाताने खूपच चिंतित झालेले जाणवले. त्यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांना आजच्या आज प्रथमदर्शनी माहितीच्या आधारे अपघाताचे कारण निश्चित करा, असा आदेश दिला होता. त्यानंतर लगेच यंत्रणा कामाला लागली. सायंकाळी उत्तर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी विभागीय वरिष्ठ अभियंत्यांसह त्यांच्या विभागातील तिघांचे निलंबनाचे आदेश काढले.जेथे अपघात झाले तेथे रेल्वेरुळांचे दुरुस्तीचे काम सुरू होते. वाहतूक सुरू असताना असे काम करायचे असेल तर कामाच्या ठिकाणाच्या ब-याच आधी लाल झेंडे लावून त्यांची पूर्वसूचना देणे बंधनकारक असते. प्राथमिक चौकशीत असे आढळले की, अपघात झाले तेथे असे झेंडे लावलेले नव्हते. परिणामी ताशी १०५ किमी वेगाने धावणा-या उत्कल एक्प्रेसच्या ड्रायव्हरला आगाऊ सूचना न मिळाल्याने भरधाव गाडीला त्याला आयत्या वेळी ब्रेक लावावे लागले. परिणामी १४ डबे रुळांवरून घसरले व काही वेगामुळे एकमेकांवर चढले. हा चुकीसाठी अभियांत्रिकी विभागास प्रथमदशर्शनी जबाबदार धरण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद (वाहतूक) यांनी दिवसभर घटनास्थळी हजर राहून खोळंबलेली वाहतूक लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने काम करून घेतले.दरम्यान, मुजप्फरनगर येथील शवागारात २३ मृतांशी ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी दिवसभर गर्दी केली. रेल्वे आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर झालेले सानुग्रहअनुदान त्यांना तेथेच वितरित करण्याची व्यवस्था केली गेली. ५० जखमींना उपचारांनंतर सोडण्यात आले. अजूनही १०२ जखमी उपचार घेत आहेत.