शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पेट्रोल पंपावर ग्राहकांची सर्रास लूट

By admin | Updated: June 23, 2016 00:08 IST

नाशिक : शहरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतांना ग्राहकांची खुलेआम लुट केली जात आहे. अनेक पंपांवर डिजीटल प्रणालीवर आधारित मशिन नसल्याने इंधनामध्ये मोठ्याप्रमाणात तुट आढळून येत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे, तर काही ठिकाणी पंपचालकांकडून इंधन सांडवले जाते.

नाशिक : शहरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतांना ग्राहकांची खुलेआम लुट केली जात आहे. अनेक पंपांवर डिजीटल प्रणालीवर आधारित मशिन नसल्याने इंधनामध्ये मोठ्याप्रमाणात तुट आढळून येत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे, तर काही ठिकाणी पंपचालकांकडून इंधन सांडवले जाते.वाहतुकीस अडथळा ठरणारे फलक हटवावेतनाशिक : शहरात ठिकठिकाणी अनधिकृत फलक लावण्यात आले असून या फलकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्ता पार करतांना देखील वाहतुकीचा अंदाज येत नसल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हे फलक हटविण्याची मागणी केली आहे.ताडपत्री घेण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दीनाशिक : पावसाळयाला सुरूवात झाली असून नागरिकांनी ताडपत्री विकत घेण्यासाठी शहरातील बाजारपेठेत गर्दी केली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची ताडपत्री घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येते.आयुक्तालयाजवळ वाहतूक कोंडीनाशिक : गंगापूररोड येथील नव्यानेच स्थापन झालेल्या पोलीस आयुक्तकार्यालयाजवळ टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी थांबे निर्माण केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस आयुक्त कार्यालयाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.शहरातील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक चुकानाशिक : शहरातील अनेक सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक चुका ठळकपणे दिसुन येत असून फलकावर सतत बदलणारी वेळ आणि विशीष्ट रंगाचा सिग्नल पडणे यात तफावत आढळून येत असल्याने तांत्रिक दोष दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.उड्डाणपुलाखाली भाजी विक्रेत्यांची गर्दीनाशिक : नाशिकरोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली बसणारे भाजी विक्रेते आता जागा अपुरी पडतेय म्हणून भाजीविक्रेत्यांनी आता पुलाच्या शेवटच्या टोकाला बसण्यास सुरूवात केली आहे. पोलिस स्टेशन पर्यंत भाजी विक्रेते बसुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.पाथर्डी फाटा: खाद्यपदार्थांच्या गाड्या हलवाव्यात नाशिक : पाथर्डी फाटा येथे पेट्रोल पंपाच्या समोर चायनिज पदार्थ विक्रीच्या गाड्या लावण्यात आल्या असून रात्री उशीरापर्यंत येथे गर्दी असल्याने परिसरातील नागरिकांनी या खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या हटविण्याची मागणी केली आहे.नव वसाहतींमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवरनाशिक : शहरात अनेक ठिकाणी नववसाहती स्थापन होत असून दुकानांच्या संख्येतही वाढ होत आहे. शहराची वाढ होत असतांना पार्किंगसाठी योग्य नियोजन होत नसल्याने व्यावसायिक तसेच ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.कचरा जाळण्याचा प्रकार नजरेआडनाशिक : सातपुर औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत कॉलनी रोड भागात रस्त्याच्या कडेला असणा-या मोकळया जागेतील गवत सर्रास पणे जाळले जात असून या ठिकाणी उभ्या असणा-या अवजड वाहनांना या आगीमुळे धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वालदेवी नदी प्रदुषणाच्या गर्तेतनाशिक : देवळाली परिसरातील वालदेवी नदीपात्रातात मोठ्या प्रमाणात प्रदुषण झाले असून नदीला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरातील नागरिकांनी नदी स्वच्छेतेची मागणी केली आहे. प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.