मेरठ : बऱ्याचदा नवीन मोबाईल घेण्यासाठी जुना मोबाईल विकण्यात येतो. उत्तर प्रदेशमधील युवक शुभम कुमारला जुना मोबाईल विकताना केलेली चूक महागात पडली आहे. या मोबाईलमुळे एक खून, एक आत्महत्या आणि पोलिस एन्काऊंटर घडले आहे. या घटनेमध्ये एक छोटी मुलगी तिच्या आईला मुकली आहे.
ही घटना मुजफ्फरनगरच्या गंगानहर कॅनॉलमध्ये घडली आहे. शनिवारी 35 वर्षीय महिलेने तिच्या 5 वर्षांच्या मुलासह कॅनॉलमध्ये उडी मारली. मात्र, तिच्या मुलाला वाचविण्यात आले. या महिलेचा मृत्यू झाला. तपासामध्ये या महिलेचे माजी प्रियकरासोबतचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे समोर आले होते.
ज्याला फोन विकला त्यानेच फोटो व्हायरल केलेया महिलेचा माजी प्रियकर शुभम कुमार याने त्यांचे फोटो डिलीट न करताच मेरठच्याच अनूज प्रजापती याला मोबाईल विकला होता. प्रजापतीने हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. खतौलीचे पोलिस अधिकारी हरिशरण शर्मा यांनी सांगितले की, महिलेच्या आत्महत्येपूर्वी तपासामध्ये एक फोन केल्याचे समोर आले होते. हा कॉल तिने तिच्या पतीला केला होता.
एन्काऊंटरमेरठ पोलिसांनी शुभमचा आणि त्याच्या मित्रांचा तपास सुरु केला. मात्र, नाकाबंदीवेळी दोन मोटारसायकलवरून जाणाऱ्या 5 जणांना रोखायचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोघांच्या पायाला गोळ्या लागल्या. हे सर्वजन प्रजापतीच्या हत्येमध्ये पोलिसांना हवे होते.