शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार कोटींच्या औषध व्यवहारांसाठी क्रिप्टो करन्सीचा वापर, तीन क्रिप्टो कंपन्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 08:03 IST

एफआययूने या संदर्भातील सविस्तर माहिती ईडी आणि आयकर विभागाला दिल्याचे समजते. 

मुंबई : देशातील काही कंपन्यांतर्फे तब्बल २८ हजार कोटी रुपयांच्या औषधांचे व्यवहार हे क्रिप्टो करन्सीद्वारे झाले असून, हे व्यवहार अवैध असल्याची माहिती वित्तीय गुप्तचर यंत्रणेने (एफआययू) दिली आहे. तसेच आता या प्रकरणाची चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि आयकर विभाग करणार आहे. एफआययूने या संदर्भातील सविस्तर माहिती ईडी आणि आयकर विभागाला दिल्याचे समजते. 

उपलब्ध माहितीनुसार, औषधाच्या खरेदी-विक्रीसाठी औषध निर्मिती कंपन्यांसाठी एक नियम-प्रक्रिया आहे. या कंपन्यांतर्फे देशांतर्गत होणारे व्यवहार हे भारतीय रुपयांत होतात तर आंतरराष्ट्रीय व्यवहार  डॉलरमध्ये होतात. मात्र, काही प्रमुख औषध निर्मिती कंपन्यांनी औषधांच्या विक्रीसाठी आणि औषध निर्मितीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या खरेदीसाठी केलेले व्यवहार हे क्रिप्टो करन्सीद्वारे केल्याची माहिती एफआययूच्या अधिकाऱ्यांना मिळाली. 

या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण २०० व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे व्यवहार प्रामुख्याने ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, नायजेरिया इथे झाल्याचीही माहिती आहे. औषध निर्मिती कंपन्यांना या व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये तीन क्रिप्टो करन्सी कंपन्या सक्रिय असल्याचे एफआययूच्या तपासात दिसून आले. तसेच या क्रिप्टो कंपन्यांच्या माध्यमातून औषध निर्मिती कंपन्यांनी तब्बल २८ हजार कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचेही सकृतदर्शनी दिसून आले आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी हे व्यवहार क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून केल्यानंतर त्याची कोणतीही माहिती कर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली नाही. त्यामुळे या २८ हजार कोटी रुपयांच्या व्यवहारांत मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी झाल्याचेही दिसून आले आहे. 

क्रिप्टोचा वापर का? आयकर विभाग करचुकवेगिरीची चौकशी करणार आहे.  तर औषध निर्मिती कंपन्यांनी आपल्या व्यवहारांसाठी क्रिप्टो करन्सीचा वापर का केला?, या मागे त्यांचा मनी लॉड्रिंग करण्याचा हेतू होता का? या अनुषंगाने सक्तवसुली संचालनालयही या प्रकरणाचा तपास करणार आहे.

टॅग्स :medicineऔषधं