शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरोधात एफ-16 वापरणं पाकिस्तानला महागात पडणार? अमेरिकेनं माहिती मागवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 17:50 IST

भारतीय हवाई दलानं एफ-16च्या वापराचे पुरावे दिल्यानंतर अमेरिका आक्रमक

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाविरोधात कारवाई करताना एफ-16 विमानांचा केलेला वापर पाकिस्तानला महागात पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी हवाई दलानं 27 फेब्रुवारीला एफ-16 चा वापर केल्याचे पुरावे भारतीय हवाई दलानं 28 फेब्रुवारी पत्रकार परिषदेत दिले. एफ-16 नं आमरार मिसाईलचा वापर केल्याचे पुरावे भारतीय हवाई दलानं प्रसारमाध्यमांना दाखवले. यानंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या एफ-16 विमानांच्या वापराची अमेरिकेनं दखल घेतली आहे. पाकिस्ताननं एफ-16 चा वापर केल्याचे पुरावे समोर आल्यानंतर अमेरिकेनं याबद्दलची अधिक माहिती मागवली आहे. 'याबद्दल माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांची आम्हाला कल्पना आहे. अमेरिकेनं तयार केलेल्या एफ-16 विमानाचा पाकिस्ताननं भारताविरोधात वापर केला. अशा प्रकारचा वापर करून पाकिस्ताननं अमेरिकेसोबतच्या कराराचा भंग केला, असं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. त्यानंतर आम्ही याबद्दलचा तपशील मागवला आहे,' अशी माहिती अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटनं पीटीआयला दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं अमेरिकेसोबत झालेल्या कराराचा पूर्णपणे भंग केला आहे. आक्रमक कारवाई करताना एफ-16 चा वापर करायचा नाही, या विमानाचा वापर केवळ दहशतवाद्यांविरोधात करायचा, अशा अटी या करारात आहेत. 'पाकिस्तानसोबत एफ-16 सोबत झालेला करार गोपनीय असल्यानं त्यामधील अटी आम्ही जाहीर करू शकत नाही,' अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते कोन फॉकनर यांनी दिली. गुरुवारी (28 फेब्रवारी) भारताच्या तिन्ही संरक्षण दलांच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात पाकिस्ताननं कारवाई करताना एफ-16 चा वापर केल्याचे पुरावे दिले. यावेळी पत्रकार परिषदेत आमरार मिसाईलचे अवशेष दाखवले. पाकिस्तानी हवाई दलातील सर्व विमानांचा विचार करता त्यातील केवळ एफ-16 विमानाकडे आमरार मिसाईल डागण्याची क्षमता असल्याचं हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी सांगितलं. एफ-16 विमानाचा वापर झाला नसल्याचा वापर पाकिस्तानकडून करण्यात आला होता. हा दावा हवाई दलानं खोडून काढला.  'प्रत्येक विमानाचा एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. भारतीय संरक्षण दलांना मिळालेला सिग्नल एफ-16 सोबत जुळतो. पाकिस्तानचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं, त्या ठिकाणी आम्हाला आमराम मिसाईलचे काही अवशेषदेखील सापडले आहेत. आमराम मिसाईल वाहून नेण्याची क्षमता केवळ एफ-16 विमानांमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्ताननं एफ-16 विमानाचा वापर झाला होता, हे सिद्ध होतं,' असं कपूर पत्रकार परिषदेत म्हणाले होते.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानUnited Statesअमेरिकाindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक